कांदा बाजारामध्ये पाठविण्याची खेड शिवापूर परिसरात लगबग

कांदा बाजारामध्ये पाठविण्याची खेड शिवापूर परिसरात लगबग

खेड शिवापूर, ता. १० : एकीकडे कांद्याचे भाव कमालीचे गडगडले आहेत तर दुसरीकडे अवकाळी पावसाची भीती आहे. या परिस्थितीत कांदा उत्पादक शेतकरी गोंधळलेले आहेत. अवकाळी पावसाने अजून नुकसान होण्याच्या भीतीने खेड-शिवापूर परिसरात मिळेल त्या बाजारात कांदा बाजारात पाठविण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.
गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत. सध्याच्या भावात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे भांडवल निघणे मुश्कील झाले आहे. अशा परिस्थितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांपुढे अवकाळीचे संकट उभे ठाकले आहे.
सध्या बाजारभाव नसल्याने काही शेतकरी कांदा साठवून ठेवण्याच्या मनःस्थितीत आहेत. मात्र, अवकाळी पावसाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था गोंधळलेली झाली आहे. अजून नुकसान होण्यापेक्षा काहीतरी रक्कम हाती लागेल, या आशेने शेतकरी मिळेल त्या बाजारात शेतकरी कांदा बाजारात पाठवू लागले आहेत.

मूळात कांद्याला बाजारभाव नाही. त्यात साठवण करावी तर पावसाची भीती आहे. त्यामुळे जास्त नुकसान होण्याऐवजी मिळेल त्या किमतीत कांदा बाजारात पाठवत आहोत.
- गणेश गोगावले, कांदा उत्पादक, गोगलवाडी

01033

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com