सिनेस्टाईलने महिलांना लुटणाऱ्यांना अटक

सिनेस्टाईलने महिलांना लुटणाऱ्यांना अटक

खेड शिवापूर, ता. ११ : बिगारी कामाच्या बहाण्याने तीन कामगार महिलांना वारजे (पुणे) येथून घेऊन पाच जणांनी सोमवारी (ता.१०) सकाळी शिंदेवाडी (ता.भोर) येथील डोंगरावर गेले. तेथे चाकूचा धाक दाखवला व या महिलांच्या अंगावरील दागिने हिसकावून घेतले आणि डोंगरात पसार झाले. मात्र, घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिसांनी सिनेस्टाईलने डोंगरात पाठलाग करून तीन आरोपींना जेरबंद केले व दोघांना वारजे येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी नितीन साहेबराव चव्हाण (वय ३० ) संतोष नागोराव कानोडे (वय २०) सुकलाल बाजीराव गिरी (वय १९) सुनील नारायण गिरी (वय १९) शैलेश शंकर सोनाळे (वय १७, सर्व रा. विठ्ठलनगर, वारजे माळवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी राजगड पोलिसांनी एकूण पाच जणांना ताब्यात घेतले आहे. याबाबत राजगड पोलिसांनी माहिती दिली. बिगारी कामासाठी महिला पाहिजे असा बहाणा करून या पाच जणांनी वारजे येथील मजूर अड्ड्यावरून तीन महिलांना रिक्षा करून शिंदेवाडी येथे आणले. शिंदेवाडी येथील डोंगरावर इमारतीचे बांधकाम काम सुरू आहे, असे सांगून त्या महिलांना त्यांनी शिंदेवाडी येथील डोंगरावर नेले. डोंगरावर निर्मनुष्य ठिकाणी गेल्यावर त्या महिलांना चाकूचा धाक दाखवला व त्यांच्या अंगावरील दागिने काढून ते डोंगरात पळून गेले. या महिलांकडील रोख रक्कम आणि अंगावरील दागिने चोरून नेले.

घाबरलेल्या महिलेने खाली येऊन स्थानिक नागरिकांना झालेल्या प्रसंगाची माहिती दिली. स्थानिक नागरीकांनी राजगड पोलिसांना कळवले. त्याबरोबर राजगडचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज नवसरे, फौजदार श्रीकांत जोशी, सहायक पोलिस निरीक्षक कृष्णा कदम, पोलिस हवलदार सागर गायकवाड, राहुल कोल्हे, महेश सूर्यवंशी यांनी ही कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com