कोळवण येथील शाळेला
पाणी शुद्धीकरण यंत्र भेट

कोळवण येथील शाळेला पाणी शुद्धीकरण यंत्र भेट

कोळवण, ता. १३ ः येथील न्यू इंग्लिश स्कूलला मायक्रोसॉफ्ट व प्लॅनेट वॉटर फाउंडेशनकडून पाणी शुद्धीकरण यंत्र
(वॉटर फिल्टर मशिन) भेट देण्यात आले. शाळेतील लेझीम पथकाने सर्व उपस्थितांचे स्वागत केले. या मशिनचे वैशिष्ट्य असे की, या मशिनला पाणी शुद्ध करण्यासाठी विजेची आवश्यकता नाही. हे मशिन प्रतितास एक हजार लिटर पाणी शुद्ध करते. शाळेतील विद्यार्थी, तसेच परिसरातील नागरिकांना यामुळे शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. या मशिनची किंमत जवळपास १६ लाख रुपये असून, मायक्रोसॉफ्ट व प्लॅनेट वॉटर फाउंडेशन यांनी त्यांच्या सामाजिक उत्तर दायित्व निधीमधून हा खर्च केला असल्याचे कंपनीच्या अधिका-यांनी सांगितले.

याप्रसंगी कंपनीकडून शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांस पाणी पिण्यासाठी ग्लास देण्यात आला. याबरोबरच शाळेतील प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना स्वच्छतेबाबत प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले.

या कार्यक्रमास मायक्रोसॉफ्ट व प्लॅनेट वॉटर फाउंडेशनचे अधिकारी उपस्थित होते. कोळवणच्या सरपंच धनश्री पालकर, सदस्य सुरेश धिडे, मुख्याध्यापिका वैशाली ढगे, विद्या कुंभार, बेबीताई काळे, गणेश केदारी, अक्षय मुरादे, पौर्णिमा जोरी, सिद्धार्थ जगताप, ज्योती चौधरी, शिवप्रसाद गुट्टे आदी मान्यवर उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com