जुमलेबाज सरकारला खाली खेचायचं

जुमलेबाज सरकारला खाली खेचायचं

कोळवण, ता. २९ : ‘‘भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारीच्या विरोधात तुतारी फुंकून केंद्रातील अहंकारी जुमलेबाज सरकारला येत्या सात मे रोजी तुतारी फुंकणाऱ्या माणसासमोरील बटन दाबून खाली खेचायचं काम आपण करायचं आहे,’’ असे आवाहन बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी केले.
दखणे (ता. मुळशी) येथे सुळे यांच्या प्रचारार्थ पौड- कासार आंबोली जिल्हा परिषद गटाचा मेळावा आयोजित आयोजित केला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी गंगाराम मातेरे, सचिन खैरे, प्रशांत कांबळे, महादेव कोंढरे, शंकर मांडेकर, अविनाश बलकवडे, संतोष मोहोळ, सविता दगडे, स्वाती ढमाले, दीपाली कोकरे, निकीता सणस, कोमल वाशीवले, लक्ष्मीबाई सातपुते, शीतल अमराळे, रामभाऊ गायकवाड, दिलीप दगडे, नामदेव टेमघरे, यशवंत गायक‌वाड, मधूर दाभाडे, संदीप हुलावळे, अनिल पवार, हनुमंत सुर्वे, ज्ञानेश्वर डफळ, शशिकांत नागरे, विलास अमराळे, विजय येनपुरे, बाळासाहेब नाकती, काशिनाथ शिंदे, अरुण कांबळे, बंडू मेंगडे,संदीप हुलावळे आदी उपस्थित होते.
सुळे म्हणाल्या, ‘‘हिंजवडी आयटी पार्कमध्ये पवारसाहेबांनी सहा लाख लोकांना रोजगार दिला. शाळा, कॉलेज, रस्ते, आयटी पार्क, साखर कारखाना मुळशीत पवारसाहेबांनी आणले. प्रत्येक घरातील व्यक्तीचा विकास होणं महत्त्वाचं आहे. यापुढील काळात पाण्याच्या नियोजनावर खूप काम करायचे आहे.’’
दरम्यान, यावेळी वारकरी संप्रदाय समाज मुळशी तालुकाध्यक्ष नारायण साठे व येळकोट सेवा प्रतिष्ठान केळेवाडीमधील एक हजार सभासदांनी सुळे यांना जाहीर पाठिंबा दिला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या...
- जो महाराष्ट्राचा विरोध करेल त्याचा विरोध आम्ही करणार.
- भाजपला मत म्हणजे महागाई व भ्रष्टाचाराला मत.
- महाराष्ट्रातील सर्व प्रकल्प गुजरातला नेले.
- दहा वर्षात भाजप व त्यांच्या नेत्यांनी स्वतःचा विकास केला व दुसऱ्यांचे पक्ष फोडले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com