कोळवण हायस्कूलमध्ये साक्षरतेची दिंडी

कोळवण हायस्कूलमध्ये साक्षरतेची दिंडी

Published on

कोळवण, ता. १० : येथील न्यू इंग्लिश स्कूल हायस्कूलमध्ये पालखी सोहळ्यानिमित्त साक्षरतेची दिंडी उत्साहात झाली. गुरुकृपा, गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था, कोळवण येथील ३५ विद्यार्थी आणि संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष हभप मुळशीभूषण मृदंगसेवक वैभव महाराज दुडे यांचे हभप मयुरेश मरगळे यांनी पखवाजची उत्कृष्ट साथ केली. पालखी सोहळ्यानिमित्त दिंडी गावातील भैरवनाथ मंदिरापर्यंत काढण्यात आली. यावेळेस गावातील घराघरात विद्यार्थ्यांनी साक्षरता विषयीची पत्रके वाटली.
दिंडीमध्ये संत निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर माउली, सोपानदेव, मुक्ताबाई, संत नामदेव, संत तुकाराम अशा संतांच्या वेशभूषा करून विद्यार्थी आले होते.
काहींनी भगव्या पताका हातात घेतल्या तर मृदंग, वीणा, टाळांच्या निनादात भजन केले, फुगडीचा खेळ खेळला. साक्षरतेची जनजागृती व्हावी म्हणून विद्यार्थ्यांनी हातात विविध घोषवाक्य असणारे फलक हातात घेतले होते. विद्यार्थ्यांस पोषण आहाराबरोबरच मिष्टान्न खायला दिले. यावेळी सरपंच धनश्री पालकर, वर्षा दुडे, कोळवणच्या मुख्याध्यापिका वैशाली ढगे सहभागी झाल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.