भालगुडीतील नारायण देव मंदिरास भाविकांची पसंती

भालगुडीतील नारायण देव मंदिरास भाविकांची पसंती

Published on

कोळवण, ता. : २७ : कोळवण खोऱ्यातील श्रीक्षेत्र भालगुडी (ता. मुळशी) येथील स्वयंभू नारायण देव मंदिरात श्रावण महिन्यातील पहिल्याच सोमवारपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी होते. नयनरम्य निसर्गच्या परिसरात असलेल्या मंदिरास पर्यटकांसह भाविकांची मोठी पसंती असते.
मुक्त हस्ताने उधळण केलेल्या ऐतिहासिक तिकोना किल्ला परिसरात वसलेले श्रीक्षेत्र भालगुडी येथील स्वयंभू नारायण देव मंदिर आहे.
भूतलावरील प्रतिविष्णू पुरी व शिवपुरी यांचे ऐक्य म्हणजेच साक्षात हरि व हर हे या मंदिरात एकाच ठिकाणी वसलेले पहावयास मिळतात मंदिराच्या सभामंडपात शिवलिंग व गाभाऱ्यात स्वयंभू श्री नारायण देवाची प्रमाणबद्ध व आखीव रेखीव चतुर्भुज मूर्ती आहे.
श्रावण महिन्यातील दर सोमवारी सकाळी आठ वाजता व सायंकाळी सहा वाजता महाआरती करण्यात येते यानंतर सत्यनारायण महापूजा व फराळाचे पदार्थ वाटप करण्यात येतात परिसरातील भजनी मंडळाचे वारकरी भजन मंदिरात दिवसभर सुरू असते.

मंदिराजवळील आध्यात्मिक स्थळे
१. ऐतिहासिक तिकोना किल्ला
२. हाडशी येथील श्री सत्य साई पांडुरंग क्षेत्र, संत दर्शन म्युझियम
३. चिन्मय मिशन कोळवण येथील गणेश मंदिर, स्वानुभुती वाटिका, हनुमान मंदिर,
४. स्वामी चिन्मयानंद यांचा क्रिस्टल व मेणाचा पुतळा

मदतीसाठी संपर्क
पौड पोलिस ठाणे : ७५२२९९०१००, ८८०५५०२५०२
कोळवण पोलिस ठाणे : मंगेश कदम - ८२०८८८०५१८
कोळवण दवाखाना : विक्रम खराडे - ८३७९९६३०२१
रुग्णवाहिका : रोहिदास टेमघरे - ९९६०२२११८८
आपत्ती व्यवस्थापन : ९६८९८८००६९,९५२९५९३९७८

02313, 02312

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com