पुणे
कोळवण येथील आदिवासी कुटुंबांना धान्याचे किट
कोळवण, ता. ९ : कोळवण येथील ३२ आदिवासी कुटुंबांना रॉबिनहूड संस्था यांच्यामार्फत व उद्योजक नितीन साठे यांच्या प्रयत्नातून मोफत धान्य किट व कपडे वाटप करण्यात आले.
या किटमध्ये तूर डाळ, तेल, गहू पीठ, शेंगदाणे, तांदूळ, मसाले, बेसन, पोहे असे साहित्य होते तर साड्या, शर्ट, पॅन्ट, टी शर्ट या साहित्याचा कपड्यांमध्ये समावेश होता. या वेळी रॉबिनहूड संस्थेचे विजय तळेजा व त्यांचे सहकारी तसेच उद्योजक नितीन साठे, नामदेव टेमघरे, पंकज धिडे, लक्ष्मण दुडे, नितीन धिडे, विकास काळभोर, बाळू ठाकर, सखाराम वाघमारे, विनायक माने, पप्पू ठाकर आदी उपस्थित होते.