नांदगाव व साठेसाई येथे बहरणार अंबराई
कोळवण, ता: १४ : नांदगाव व साठेसाई (ता. मुळशी) येथे फिनिक्स मेकॅनो (इं) प्रायव्हेट लिमिटेडच्या सीएसआर अंतर्गत दोन हजार केशर आंबाच्या रोपांचे मोफत वाटप नागरिकांना शनिवारी (ता.१३) करण्यात आले. यामुळे गावातील वनराई वाढून पर्यावरण समतोल राखण्यासाठी मदत होणार आहे. तर होईलच परंतु दर्जेदार केशर आंबा वृक्षांची फळे सुद्धा होऊन दुहेरी लाभ साधला जाईल
कोळवण खोऱ्यातील भागात कलमी आंबा झाडे हापूस,पायरी,केशर नगण्य आहेत. येथील शेतकरी कलमी आंबा झाडे लावण्यात निरुत्साही होते. याचा विचार करून कंपनी व्यवस्थापनाने मागील दोन वर्षांपूर्वी चिखलगाव येथे दोन हजार केशर आंबा रोपे लागवड करण्यासाठी दिली तर आता नांदगाव व साठेसाई येथील शेतकऱ्यांना दोन हजार केशर आंबा रोपे लागवड करण्यासाठी दिली आहेत.
दरम्यान, फळझाडे वाटप करून न थांबता दोन्ही गावांतील शेतकऱ्यांनी फळझाडांची व्यवस्थितपणे देखभाल व जोपासना करून ती जगवणार आहोत, अशी भावना देखील व्यक्त केली. यावेळी फिनिक्स मेकॅनो (इं) प्रायव्हेट लिमिटेडचे सचिन पवार, प्रशांत पाखर, किरण जगताप, कमलेश राऊत, वामन सुर्वे, भाऊ लगड, नितीन हाते तसेच नांदगावचे माजी उपसरपंच चेतन फाले, शंकर खिलारी, बबन फाले, सोमाजी फाले, राजू फाले, किरण गोविंद फाले, किरण राम फाले, प्रवीण साठे, सुमन साठे, गणपत हौशाराम साठे, काशिनाथ साठे, गणपत साठे, ज्ञानेश्वर खिलारी, दिलीप खिलारी, यशवंत सोनवणे, नवनाथ साठे, नामदेव खिलारी, अर्जुन साठे तसेच दोन्ही गावांतील शेतकरी बांधवांनी आंबा रोपे घेण्यासाठी गर्दी केली होती.
चिखलगाव येथे फिनिक्स मेकॅनो (इं) प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व्यवस्थापनाने त्यांच्या सीएसआर प्रोजेक्ट अंतर्गत गावातील पायाभूत सुविधा उंचावण्यासाठी काम केले आहे, त्यासोबतच आता साठेसाई व नांदगाव येथील गावात केशर आंबा रोपे लागवड करण्यासाठी देऊन या गावांचा प्रतिसाद पाहून यापुढे तेथील पायाभूत सुविधा उंचावण्यासाठी काम करण्याचा कंपनी व्यवस्थापनाचा मानस आहे.
- उमेश बारवकर, सहाय्यक व्यवस्थापक, एच आर फिनिक्स मेकॅनो (इं) प्रायव्हेट लिमिटेड
02427