कोळवणमध्ये केवळ इमारतीच्या भींतीच शिल्लक

कोळवणमध्ये केवळ इमारतीच्या भींतीच शिल्लक

Published on

पांडुरंग साठे : सकाळ वृत्तसेवा
कोळवण, ता २३ : कोळवण (ता. मुळशी) येथे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पशुवैद्यकीय दवाखान्याच्या केवळ भिंतीच शिल्लक आहेत. त्यासुद्धा कधी कोसळतील याचा नेम नाही. दवाखान्याच्या परिसरात गवत, झाडाझुडपांचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे पशुधन पर्यवेक्षकांवर जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीत पशुधनावर उपचार करण्याची वेळ आली आहे.

श्रेणी दोनचा पशुवैद्यक दवाखान्यांतर्गत कोळवण, होतले, साठेसाई, भालगुडी, डोंगरगाव, वाळेण, हाडशी व काशिग ही आठ गावे आहेत. या गावांसाठी डॉ. जगन्नाथ पाटील हे पशुधन पर्यवेक्षक पशुधनासाठी काम पाहत आहेत. येथे जनावरांना योग्य उपचार मिळत असल्याने खासगी डॉक्टरांकडून उपचार करण्याची वेळ येत नाही. त्यामुळे खर्चात बचत होते तसेच जनावरांना कॅल्शियम व इतर औषधे सुद्धा नाममात्र दरात उपलब्ध आहेत.


परिसरातील पशुधन
गाई...........१५९४
म्हैस...........१३९०
शेळ्या...........३२४
मेंढ्या...........११

दृष्टिक्षेपातील दवाखाना
- फिरत्या पशुवैद्यकीय पथकाद्वारे दर बुधवारी गावोगावी रुग्णवाहिकेचा वापर
- पशुपालकांनसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला नाही.
- शासकीय योजनांद्वारे शेळ्या, बोकड, गाई, म्हैससाठी ऑनलाइन अर्ज
- एप्रिल ते ऑक्टोबरमध्ये ४१० कृत्रिम रेतन
- १० ते १२ हेक्टरवर चारा उत्पादन क्षेत्र
- परिसरातील ५० शेतकऱ्यांचे चारा पिकासाठी अर्ज
- पशुपालकास पाच ते दहा किलो बियाणे उपलब्ध होईल.


जिल्हा परिषदेच्या योजनांपासून पशुपालक दूर
पशुवैद्यकीय दवाखाना राज्य सरकारचे अखत्यारीतील असल्याने जिल्हा परिषदेचे पशुवैद्यक विभागाच्या योजनांचा लाभ पशुधन पालकांना मिळत नाही. यामध्ये जनावरांना बसण्यासाठी मॅट, बादली, घमेले,कॅन, धार काढणी यंत्र व चारा बियाणे मिळत नाही.

लसीकरण
लंपी........२९९८
घटसर्प........१०००
पीपीआर........३००
आंत्रविषार........३००
फऱ्या........१००

रिक्त पदे
पशुधन विकास अधिकारी श्रेणी - १
परिचर - १

यांची आहे गरज
- अडीच गुंठे शासकीय भूखंडावरील क्षेत्रावर सुसज्ज इमारत
- वीज, पाणी, सुरक्षा रक्षक,
- औषधोपचारासाठी लागणारे साहित्य


मागील दीड वर्षांपासून कोळवण पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुवैद्यकीय पर्यवेक्षक म्हणून मी काम पाहत आहे येथील इमारत पडल्याने सध्या शाळेच्या खोलीत जनावरांवर उपचार करत आहे. येथे नवीन सुसज्ज इमारतीची आवश्यकता आहे.
- डॉ. जगन्नाथ पाटील, पशुवैद्यकीय पर्यवेक्षक, कोळवण

कोळवण येथील दवाखान्यातील डॉक्टर जनावरांवर वेळेत उपचार

करतात. गावोगावी जाऊन तेथील जनावरांवर देखील उपचार करतात लसीकरण मोहीम वेळेवर होते. यामुळे जनावरांना साथीचे आजार होत नाही. आमच्या जनावरांवर उपचार करण्यासाठी खासगी डॉक्टराला बोलवावे लागत नाही. कोळवण येथे नवीन सुसज्ज इमारतीची आवश्यकता आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घ्यावा.
- रामदास पडवळ, पशुधन पालक, डोंगरगाव गावठाण

02682

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com