रखडलेल्या इमारतीस झाडाझुडपांचा विळखा

रखडलेल्या इमारतीस झाडाझुडपांचा विळखा

Published on

पांडुरंग साठे : सकाळ वृत्तसेवा
कोळवण, ता. १४ : पौड (ता.मुळशी) येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीचे बांधकाम दोन वर्षांपासून रखडले आहे. सध्या या इमारतीस झाडाझुडपांचा विळखा पडला आहे. यामुळे परिसरातील पशुपालकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे नव्या इमारतीची निधी मंजूर करण्याची मागणी पशुपालकांमधून होत आहे.
या इमारतीच्या बांधकामासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने ऑक्टोबर २०२१ मध्ये सुमारे पंचेचाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. त्याचे भूमिपूजन ३० ऑक्टोबर २०२१ रोजी तत्कालीन जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतारे, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाबूराव वायकर यांचे हस्ते करण्यात आले होते.
दरम्यान, ठेकेदाराने काम सुरू केले इमारत बांधकाम अर्ध्यावर आले तरीही ठेकेदारास शासनाने मंजूर निधीमधून बिल दिले नाही. ठेकेदाराचे म्हणण्यानुसार त्याचे शासनाने या कामाचे वीस लाख रुपयांचे बिल थकवले. यामुळे इमारत बांधकाम अर्ध्यावर सोडून दिले.
दरम्यान, इमारतीच्या बांधकामासाठीचा निधी परत गेलाय असं निदर्शनास आले आहे.


नव्याने निधी मंजूर करण्याची मागणी
आता अर्धवट अवस्थेत असणाऱ्या इमारतीस पुन्हा एकदा नव्याने निधी मंजूर करून हे काम पूर्ण करण्यात यावे अशी येथील पशुधन पालकांची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गजानन पाटील यांच्याकडे मागणी आहे.


परिसरातील पशुधन
म्हैस.........११५४
गाई.........८९६
मेंढ्या.........८९
शेळ्या.........१७


लसीकरण
लाळ्या खुरकूत २२००
लंपी.........१५००
घटसर्प १०००
पीपीआर १००

दृष्टिक्षेपात
- रिक्त पदे नाहीत सर्व पदे भरली
- फिरते पशुवैद्यकीय पथक
- २२४५ शेतकऱ्यांना वैरण बियाण्यांचे वितरण
- ऑक्टोबरपर्यंत झाले ५५७ कृत्रिम रेतन

या गावांचा समावेश
पौड
दारवली
करमोळी
विठ्ठलवाडी


पशुपालकांसाठी आयोजित प्रशिक्षण सत्रांची संख्या ........ १
सहभागी प्रशिक्षक ........ ५६


यांची आहे गरज
- स्वतंत्र सुसज्ज इमारत
- एक्स रे मशिन

- सोनोग्राफी सुविधा,
- सुसज्ज प्रयोगशाळा
- औषधोपचारासाठी आवश्यक फर्निचर


पौड येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीचे अर्धवट अवस्थेतील अपूर्ण बांधकाम मागील दोन वर्षांपासून बंद आहे. ते पुन्हा सुरू व्हावे व येथे सुसज्ज इमारत व्हावी. अत्याधुनिक वैद्यकीय साधने उपलब्ध व्हावीत जेणेकरून तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखाना असल्याने येथे पशुधनावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उपचार करता येतील.
- सोनल हिंगाडे, पशुधन विकास अधिकारी, पौड


मी अडीच वर्षांपूर्वी पौड येथील या पशुवैद्यकीय दवाखाना इमारतीचे काम केले. काम निम्मे झाले तरी मला माझ्या कामाचे बिल मिळाले नाही माझे वीस लाख रुपयांचे बिल थकले आहे मी हा सर्व खर्च माझ्या खिशातून केला तरीही शासनाने बिल दिले नाही आता असं कळतंय हा निधीच परत गेलाय,
ठेकेदाराचे पैसे मिळणार नसेल तर कामं कशी पूर्ण होणार माझे थकलेले बिल शासनाने द्यावे, असे पौड येथील पशुवैद्यकीय दवाखाना इमारत बांधकाम ठेकेदार अतुल महाले यांनी सांगितले.

02741

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com