पौड-कोळवण रस्ता कामात घोटाळा?
कोळवण, ता.१३ : पौड-कोळवण-काशिग या मार्गावरून पुढील वर्षी १९ ते २३ जानेवारी दरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुणे ग्रॅंड टूर चॅलेंज सायकल स्पर्धा पार पडणार असून या स्पर्धेत सुमारे ४० देशांमधील सायकल स्पर्धेक सहभागी होणार असून या स्पर्धेसाठी सायकल ट्रॅक म्हणून पौड कोळवण काशिग रस्ता होण्यासाठी शासकीय अंदाजपत्रकानुसार सुमारे १४.९७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायकल स्पर्धा होणार म्हणून एवढा मोठा निधी मंजूर झाला असला तरीही शासनाने दिलेल्या अंदाजपत्रकानुसार या रस्त्याचे काम होत नाही, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाध्यक्ष सचिन खैरे यांनी केला आहे.
त्यांनी या रस्त्यावर पदाधिकाऱ्यांना घेऊन स्वतः सुरू असलेल्या कामाची पाहणी केली हाडशी गावाच्या हद्दीत एका ठिकाणी या रस्त्यावर चक्क मातीवर डांबरीकरण करण्यात आले होते. खैरे यांनी तेथील काम करत असलेल्या कामगारांना याचा जाब विचारला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यांनी कामाच्या गुणवत्तेबाबत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला व तत्काळ दर्जेदार काम करण्याच्या सूचना दिल्या. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायकल स्पर्धेसाठी रस्ता तयार होतोय याचा आनंद आहे निधी सुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला आहे त्यामुळे या रस्त्याचे काम हे गुणवत्तापूर्ण असेच व्हायला हवे हा रस्ता केवळ सायकल स्पर्धेसाठी रस्ता तयार होणार नसून त्यानंतरही या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी असणार आहे. हाच रस्ता मुळशी व मावळला जोडतो येथे पर्यटक संख्या मोठी आहे या गोष्टी सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यायला हव्यात या कामाच्या बाबतीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी डोळेझाक केली आहे असाही आरोप खैरे यांनी केला.या वेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य राम गायकवाड, स्थानीय लोकाधिकार समितीचे नामदेव टेमघरे, संभवे गावचे सरपंच प्रशांत जोरी, नितीन लोयरे आदी उपस्थित होते.
जेथे कोठे कामासंदर्भात तक्रारी व त्रुटी असतील तर त्या ठेकेदाराकडून ताबडतोब दुरुस्त केल्या जातील.
- संकेत साळुंके, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
2743
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

