मासळकरला यांना कृषी उद्योजक पुरस्कार प्रदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मासळकरला यांना कृषी उद्योजक पुरस्कार प्रदान
मासळकरला यांना कृषी उद्योजक पुरस्कार प्रदान

मासळकरला यांना कृषी उद्योजक पुरस्कार प्रदान

sakal_logo
By

शिक्रापूर, ता.१८ : जातेगाव खुर्द (ता.शिरूर) येथील युवा कृषी उद्योजक अक्षय दत्तात्रेय मासळकर यांना राष्ट्रीय कृषी उद्योजक हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कृषी क्षेत्रातील भरीव कामगिरीची दखल घेत केंद्र सरकारच्या शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो.
कृषी मंत्रालयाच्या केंद्रीय सचिव श्रीमती शुभा ठाकूर यांचे हस्ते प्रदान झालेला हा पुरस्कार थेट दिल्लीत पाचारण करून अक्षय मासळकर यांना समारंभपूर्वक देण्यात आला. मासळकर यांनी २०१९ मध्ये पुणे येथील शाश्वत शेती विकास प्रतिष्ठानमधून केंद्र सरकारच्या एसी अ‍ॅंड एबीसी योजनेतर्गत प्रशिक्षण घेतले होते. त्यानंतर त्याने अँग्रीबायोनिक्स प्रायव्हेट लिमिटेड या नावाने कृषिउद्योग सुरु केला. या उद्योगातील त्याची गती, प्रगती आणि कल्पनाविस्तार यावर त्याने सादर केलेल्या प्रकल्प अहवालावरून त्याला हा पुरस्कार जाहीर झाला व प्रदान झाला.
सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफल व प्रोत्साहनपर रोख रक्कम असे स्वरूप असलेल्या या पुरस्कार वितरण प्रसंगी कृषी मंत्रालयाचे अतिरिक्त आयुक्त संजय कुमार, संचालक साजितकुमार कुन्हालाथ, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चरल एक्स्टेन्शन मॅनेजमेंटचे महानिर्देशक डॉ.पी.चंद्रशेखर, नाबार्डच्या महाव्यवस्थापिका निवेदिता तिवारी, स्टेट बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक शंतनू पेंडसे, संमनती फायनान्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमार, डॉ.शहाजी फंड, शाश्वत शेती प्रतिष्ठानचे प्रमुख अवधूत कदम, दत्तात्रेय जाधव, अतुल खडे व उर्वरित महाराष्ट्रासह जातेगाव येथील युवा शेतकरी उपस्थित होते.

02548