मुखई आश्रमशाळा सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धेत अजिंक्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुखई आश्रमशाळा सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धेत अजिंक्य
मुखई आश्रमशाळा सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धेत अजिंक्य

मुखई आश्रमशाळा सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धेत अजिंक्य

sakal_logo
By

शिक्रापूर, ता.२३ : मुखई (ता.शिरूर) येथील रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील मुलींच्या संघाने राज्य शालेय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. जालना (जि.जालना) येथे झालेल्या स्पर्धेत संघाने कोल्हापूरचा दारुण पराभव केला व प्रथम क्रमांकाला गवसणी घातली.

सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील सॉफ्टबॉल क्रीडा संघ दाखल झाले होते. यात रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वयोगट १७ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने पहिल्यापासूनच आघाडी घेत घेतली. नाशिक व नंतर मुंबई विभागातील संघांवर मोठा विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीतही कोल्हापूर संघाचे कडवे आव्हान मोडून काढीत राज्यस्तरीय अजिंक्यपद पटकावल्याची माहिती संस्थाध्यक्षा जयश्री पलांडे, कार्याध्यक्ष अ‍ॅड.अशोकराव पलांडे व सचिव सुरेश पलांडे यांनी दिली.
दरम्यान, या यशाचे श्रेय यशस्वी विद्यार्थी, ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापनाकडून क्रीडा शिक्षक मनोज नामदेव धिवार, हनुमंत किसन जाधव व सविता संदीप लिमगुडे या तिघांना देत त्यांचे विशेष कौतुक सर्वस्तरांवर होत असल्याची माहिती प्राचार्य तुकाराम शिरसाठ यांनी दिली.

विजेत्या संघाचे नेतृत्व सिद्धी गावडे हिने केले तर संघात गीता पारकर, समीक्षा मेचे, अंजली राठोड, श्रद्धा गावडे, श्रेया इंगळे, प्रजा मलगुंडे (कॅचर), स्मृती सांगळे, नीता घोडे, प्रतिक्षा काळे, आर्या शिरसाट, सिद्धी झुरुंगे, सानिष्का दोरगे, श्रेया यादव आदी सर्वच संघसदस्यांनी विशेष योगदान दिले आहे.


02644