‘नवोदय’साठी शिरूर, इंदापूर तालुक्याची आघाडी

‘नवोदय’साठी शिरूर, इंदापूर तालुक्याची आघाडी

शिक्रापूर, ता. ३ ः केंद्र सरकारच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या पिंपळे-जगताप (ता. शिरूर) येथील नवोदय विद्यालयातील शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठीच्या इयत्ता सहावीसाठी ८० विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्याची यादी नुकतीच विद्यालयाच्या वतीने देण्यात आली. संपूर्ण पुणे शहर-पिंपरी चिंचवड व ग्रामीणच्या १३ तालुक्यातून सुमारे १३ हजार ५०० पेक्षा जास्त विद्यार्थी बसलेल्या या संपूर्ण निकालात शिरूर व इंदापूर तालुक्यातील सर्वाधिक १५ विद्यार्थ्यांची निवड झाली असून स्कॉलरशिप परीक्षा निकालासारखाच नवोदय विद्यालय प्रवेश निकालातही शिरुरने आपला अव्वल नंबर यावर्षी प्रस्थापित केल्याची माहिती प्राचार्य बी. आर. खेडकर यांनी दिली.
चालू शैक्षणिक वर्षासाठी निवड झालेले विद्यार्थी, कंसात त्यांची शाळा, गाव व तालुकानिहाय यादी पुढीलप्रमाणे.
आंबेगाव तालुका : कैवल्य जीवन कोकणे, समर्थ अनंत जोशी, प्रज्ञेश राहुल पाटील, अन्वित महेश गावडे (जिल्हा परिषद शाळा, मोरडेवाडी), आदिती योगेश तगड, वैष्णव नवनाथ पाबळे, आराध्या संजय गोराडे (जि. प. शाळा, शिंगणे), वेदिका विकास थोरात, वेदांत दत्तात्रेय बोऱ्हाडे (जि. प. शाळा, पिंपळगाव-म्हाळुंगे)
बारामती तालुका : विवेक विजयकुमार अवघडे व रुचा विजयकुमार अवघडे (नवमहाराष्ट्र विद्यालय, पांढरे), स्वरा देवदत्त राऊत (सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल, बाधलवाडी), श्रीशैल धनराज कदम (के. बी. पी. विद्यालय, सांगवी), सृष्टी संदीप चव्हाण (जिल्हा परिषद शाळा, सांगवी).
भोर तालुका : साई गणेश कंक (गव्हर्नमेंट सेकंडरी आश्रम शाळा, पांगरी), ईश्वरी हनुमंत दुरकर (जिल्हा परिषद शाळा, येवाली)
दौंड तालुका : शार्दूल रवींद्र भोसले (ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल, वरवंड), अवधूत दीपक बारावकर (श्री सदगुरु विद्यालय, देऊळगाव-वाडा), संग्राम संतोष राऊत (राजेभोसले विद्यालय, खानोटे)
हवेली तालुका : स्मित रोहीत रोकडे (अमनोरा स्कूल, वाघोली), वेदांत सुधीर धुस, जान्हवी जीवन वाडेकर, प्राप्ती प्रमोद जावळगे, हर्षवर्धन श्रीकांत पालवे (जिल्हा परिषद शाळा, लोणीकंद), व्यंकटेश विक्रम खाडे (गांधी विद्यालय, खानापूर), स्पर्श बाबूराव वाळके (कॉन्व्हेंट स्कूल, लोणीकंद)
इंदापूर तालुका : स्वराली विकास भोंग (जिल्हा परिषद शाळा, व्याहळी), राजदीप दिलीप कांबळे (जि. प. शाळा, दलालवाडी), प्रथमेश श्यामसुंदर माने, शिवतेज आंबादास धुके, मल्हार श्रीकांत करे, हर्षराज करण म्हेत्रे, ऋतुराज अमोल शेंडे, आरुष नीलेश गावडे (गुरुकुल विद्यामंदीर, गोखळी), समर्थ सतीश नवले, सुधांशू अनिल भागवत (जि. प. शाळा, तक्रारवाडी), अमृता उमेश भांडे (एम. एस. बिल्ट शाळा, बादलवाडी), अनुराग तेजस भोंग (एम. पी. व्ही. शाळा, वरकुटे खुर्द), सोहम सोमनाथ बुलबुले (केतकेश्वर विद्यालय, निमगाव केतकी), श्रीवर्धन परशुराम धपते (जि. प. शाळा, बऱ्हाणेवाडी), क्षितीजा चंद्रकांत मगतराव, राजरत्न नितीन मखरे (जि. प. शाळा, गलांडवाडी)
जुन्नर तालुका : नीरज संतोष बेळे (जि. प. शाळा, आळेफाटा), शौर्य कुलदीप सहाणे (सबनीस विद्या मंदिर, नारायणगाव), अनघा सुधीर धनापुणे (ज्ञानमंदिर, आळे), श्रेया पंजाबराव थोरात (ए. ए. विद्यालय, पिंपरी-पेंढार)
खेड तालुका : प्रज्वल दादाभाऊ गोडसे (स. प. इंग्लिश स्कूल, पिंपरी-बुद्रुक), प्रेम रोहीदास वाघ (विद्या इंटरनॅशनल स्कूल, राक्षेवाडी), ज्ञानेश्वरी विशाल ढमाले (जि. प. शाळा, कडूस), धनश्री गणेश पावले (जि. प. शाळा सातकरवस्ती), मुक्ता गजानन नरवडे (नगर परिषद शाळा, आळंदी), ऋतुजा महादेव तळदे (धानोरे)
मावळ तालुका : आदित्य एकनाथ पदर, हर्षल रघुनाथ बागड, आर्यन राहुल होवळ (जि. प. शाळा, पिंपलोळी), श्रावण ज्ञानेश्वर तिडके (जि. प. शाळा, आढे), दक्ष रवींद्र वाडेकर (पवना विद्यामंदीर, पवनानगर), वैष्णवी तुकाराम खल्लारे (जि. प. शाळा, खल्लारे)
मुळशी तालुका : यशराज जितेंद्र पाटील (सनफ्लॉवर शाळा, मारुंजी), क्षितिज अविनाश मोरे (जि. प. शाळा, लव्हाळे), वेदांत जानबा कांबळे (जि. प. शाळा, भूगाव नं. १), प्रांजल रोहीत गायकवाड (जि. प. शाळा, नांदे)
शिरूर तालुका : सक्षमा शरद ताजणे, भक्ती हेमंत मोटे, श्रेयस समाधान राणेर, वैष्णवी दिगंबर घडशी (जिल्हा परिषद शाळा, कोयाळी-पुनर्वसन), वेदांत अनिल झोपे (जि. प. शाळा, शिक्रापूर),
सरोदे नित्य दिनकर (विजयमाला विद्यामंदिर, शिरूर), विधाते हर्षल अर्जुन (जि. प. शाळा, शिरसगाव काटा), कौस्तुभ लक्ष्मण मोरे, ओंकार आजिनाथ दहिफळे, पियुश विजय शितोळे (जि. प. शाळा, तळेगाव-ढमढेरे), समृद्धी विनायक वांदरे (कुमार जयसिंगराव ढमढेरे विद्यालय, तळेगाव), आचार्य साहिल संतोष (सणसवाडी विद्यालय, सणसवाडी), सात्त्विक योगेश भोस (विद्याधाम प्रशाला, शिरूर), कमय संजय जाधव (प्रतिमा पलांडे स्कूल, शिक्रापूर), प्रज्वल संतोष भालेराव (जि. प. शाळा, गुनाट)
पुरंदर तालुका ः आसावरी सुहास आगम (जि. प. शाळा, सुके खुर्द, ता. पुरंदर)
चिंचवड ः चारवी संज्योत कोळेकर (छत्रपती शिवाजीराजे विद्यालय, चिंचवड),

निवड झालेल्या विद्यार्थी-पालकांनी थेट संपर्क करावा
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश कसा करावा व काय प्रक्रीया आहे याबाबत प्रत्येकाला कळविलेले आहे. मात्र ज्यांना समजले नाही त्यांनी कृपया विद्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य बी. आर. खेडकर यांनी केले आहे. या प्रक्रियेत काही खासगी व्यक्तीही पालकांना वेगळी माहिती देत असल्याची चर्चा आहे. विद्यालयात येऊनच समक्ष भेटून बोलण्याचे आवाहनही विद्यालयाचे वतीने करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com