शिरूरमधील शिक्षक सक्तीच्या रजेवर

शिरूरमधील शिक्षक सक्तीच्या रजेवर

Published on

शिक्रापूर, ता. १० : शिरूर तालुक्यातील पाबळ-केंदूर जिल्हा परिषद गटातील एका जिल्हा परिषद शाळेतील आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओच्या प्रकरणातील शिक्षकाला सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले असून, त्याचा मासिक पगारही काढला जाणार नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शिरूर पंचायत समितीने घेतल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर यांनी दिली.
या शिक्षकाचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ सोशल मिडीयावर फिरल्याप्रकरणी स्थानिक ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती, माजी सभापती प्रकाश पवार व मनसेचे तालुकाध्यक्ष तेजस यादव यांच्या तक्रारीनुसार शिरूर पंचायत समितीने चौकशी समिती नेमून तिचा अहवाल जिल्हा परिषदेला सादर केला होता. शिरूरचे गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर यांच्या अध्यक्षतेखाली एक विस्तार अधिकारी व एक केंद्रप्रमुख, अशी तिघांची नवीन चौकशी समिती नेमली गेली. या समितीचा अहवाल आता जिल्हा परिषदेला जाणे बाकी आहे. या अहवालानुसार पुढील कारवाई होणार असल्याचे जिल्हा परिषदेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, संबंधित शिक्षकाला जिल्हा परिषदेने सक्तीने रजेवर पाठविलेले असून, त्याचा या मासिक पगारही गोठविण्यात आला आहे. या प्रकरणाचा निपटारा होईपर्यंत संबंधित शिक्षक हा बिनपगारी ठेवण्यात येणार असल्याचे बाबर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.