सणसवाडी येथील 
दोन टपरीचालकांना अटक

सणसवाडी येथील दोन टपरीचालकांना अटक

सणसवाडी, ता. ८ ः सणसवाडी (ता.शिरूर) येथील मुख्य चौकातील काही पान टपरींमध्ये मानवी जीवितास धोका निर्माण करणारी पावडर वापरून गुंगीपान विकले जात आहे. अशी तक्रारी शिक्रापूर पोलिसांकडे गेल्या काही दिवसांपासून येत होत्या. याच पार्श्वभूमिवर पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी पुढाकार घेऊन सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, पोलिस शिपाई जयराज देवकर, निखिल रावडे यांचे पथक बनवून सणसवाडीतील सरदार पान शॉप व पाटील पान दरबार शॉप येथे छापा टाकला असता दोन्ही ठिकाणी गुंगीपाने आढळून आली.

यात उग्र वासाची, मानवी जीवितास धोका निर्माण करणारी पावडर टाकल्याचेही निष्पन्न झाले आहे. घातक गुंगीची पावडर व इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले. पोलिस शिपाई जयराज वसंत देवकर (रा. शिक्रापूर) यांच्या फिर्यादीवरून सरदार पान शॉपचा चालक गौरव पांडुरंग खळदकर (वय २८, रा.बजरंगवाडी, शिक्रापूर ता.शिरूर, मूळ रा. खळद ता. पुरंदर) तसेच पाटील पान दरबार शॉपचा चालक चंद्रकांत बापू मोहिते (वय २८, रा. सणसवाडी, ता. शिरूर) या दोघांवर घातक रसायन विक्रीविरोधी कायद्यान्वये गुन्हे दाखल केले. दरम्यान दोघांनाही अटक केली आहे.


नमुने फॉरेन्सिक लॅबकडे
गुंगीरसायन विक्री शिक्रापूर हद्दीत जोरात सुरू असल्याबाबत साधारण दहा महिन्यांपूर्वी एक गुन्हा दाखल होऊन त्यात अन्न आणि औषध प्रशासनाकडे हे रसायने पाठविली होती. मात्र, इतक्या गंभीर प्रकरणात अन्न आणि औषध प्रशासनाची उदासीन भूमिका राहिल्याने शिक्रापूर पोलिसांनी हे गुंगीरसायन थेट फॉरेन्सिक सायन्स लॅबरॉटरी (एफएसएल) कडे पाठविले आहे. साधारण दोन महिन्यांत याचा अहवाल मिळताच दाखल गुन्ह्यांमध्ये आणखी कलमे वाढविणार असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com