तांब्याच्या केबल, बॅटऱ्या चोरणाऱ्या टोळीला अटक
शिक्रापूर, ता. १९ ः रिलायन्स जिओ कंपनीच्या गोडाऊनला भगदाड पाडून तांब्याच्या केबल, मोबाईल टॉवरसाठी वापरण्यात येणाऱ्या बॅटऱ्यासह साहित्याची चोरी करणाऱ्या आरोपींना शिक्रापूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली. आलम मणियार, अनिल गुप्ता, वीरेंद्र जाटाव, विशाल कश्यप, शिवम कश्यप, श्यामजी यादव अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिक्रापूर (ता. शिरूर) येथील रिलायन्स जिओ कंपनीच्या गोडाऊनला ६ तारखेला भगदाड पाडून तांब्याच्या केबल व साहित्याची चोरी केली. नितीन गोपाळा भोर (वय ४०, रा. गाडेवस्ती, वाघोली, ता. हवेली) यांनी शिक्रापूर पोलिस ठाणे येथे तशी फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता. दरम्यान, आरोपींनी गुन्हा करण्यासाठी लाल रंगाची युनिकॉर्न दुचाकी व एक टेम्पो वापरण्यात आली. या पथकाने या आरोपींची माहिती मिळविली व गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांच्या आधारे आलम युनूस मणियार (वय ३४, रा.गायकवाडनगर, पुनवळे, ता.हवेली), अनिल लखीराम गुप्ता (वय ३९, रा. लक्ष्मीमाता मंदिर, भारतनगर, कत्तारवाडी, येरवडा, पुणे), वीरेंद्र धरमसिंग जाटाव (वय २७, रा. गायकवाड नगर, पुनवळे, ता. हवेली, जि. पुणे, मूळ रा.गडीवाधवा, ता. हिंडोनसीटी, जि. करोली, राजस्थान), विशाल पप्पू कश्यप (वय १९, सध्या रा.मुंजाबावस्ती, विमान बिल्डिंग शेजारी, श्रीहंसनगर, धानोरी, पुणे, मूळ रा. मुलीयामऊ कायतंगापूर्वा, ता. रायबरेली, जि. रायबरेली, उत्तरप्रदेश), शिवम बजरंगी कश्यप (वय २२, सध्या रा.मुंजाबावस्ती, विमान बिल्डिंग शेजारी, श्रीहंसनगर, धानोरी, पुणे, मुळ रा.मुलीयामऊ, कायतंगापुर्वा, ता. रायबरेली, जि.रायबरेली, उत्तरप्रदेश), श्यामजी चिकनू यादव (वय २४, सध्या रा.गायकवाडनगर, पुनावळे, ता. हवेली, जि.पुणे, मुळ रा.तिरलोकपुर, ता.इतवारी, जि.सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश) यांच्यासह एकूण नऊ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

