कोरेगाव भीमा येथे बसला भीषण आग
शिक्रापूर, ता. ३१ ः कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील डिंग्रजवाडी फाट्याजवळ गुरुवारी (ता. ३०) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास एका खासगी कंपनीच्या बसने अचानक पेट घेतल्याची घटना घडली.  
कोरेगावात गुरुवारचा मोठा आठवडे बाजार असल्याने मोठ्या संख्येने परिसरातील ग्राहकांची वर्दळ असतानाच हा प्रकार घडल्याने पोलिस प्रशासनासह स्थानिकांची चांगलीच धावपळ झाली. दुर्घटनाग्रस्त बसचा वाहनचालक कैलास ताठे आणि गाडीतील प्रवाशांनी प्रसंगावधान राखून मिळेल त्या खिडकीतून बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली. बसचालक हा बस (क्र. एमएच १२ व्हीएफ ६५२६) घेऊन जात असताना बसने अचानक पेट घेतला. त्यांनतर बसचालकाने प्रवाशांना सावध करून खाली उतरवले. घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिस घटनास्थळी पोहचले. पोलिसांसह स्थानिकांनी अग्निशामन यंत्रणेलाही बोलावून आग आटोक्यात आणली. 
यावेळी मदतीसाठी अग्निशमन दलाचे समन्वयक शुभम चौधरी, वाहनचालक शुभम बढे, अग्निशमन विमोचक सूरज इंगवले, योगेश पाटील, कृष्णा नागरे, सिद्धार्थ जाधव, पोलिस पाटील मालन गव्हाणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल देशमुख, पोलिस हवालदार श्रावण गुपचे, एन. डी. नाईकडे व इतर पोलिस कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. 
05053
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

