जातेगावातून चोरलेला ट्रॅक्टर दौंडमधून ताब्यात
शिक्रापूर, ता. ४ ः जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथील व्यंकटेशकृपा शुगर मिल्स साखर कारखान्यासमोर उभा असलेला ट्रॅक्टर एकाने भर दिवसा पळविला. याबाबत शिक्रापूर पोलिसांकडे तक्रार दाखल होताच, पोलिसांनी ट्रॅक्टरचा माग काढत थेट दौंड गाठले आणि ट्रॅक्टर चोरासह ट्रॅक्टर ताब्यात घेतला. सदर चोरी ही उसने पैसे देणे-घेण्यावरून केल्याची कबुली चोराने पोलिसांना दिली. दरम्यान ट्रॅक्टर मालक व चोरटा हे दोघेही बीड जिल्ह्यातील असल्याची माहितीही शिक्रापूर पोलिसांनी दिली.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथील व्यंकटेशकृपा शुगर मिल्स साखर कारखान्यासमोर रविवारी (ता. १) अनिल पवार यांनी त्यांचा ट्रॅक्टर (एम एच १६ बि एम ४३६२) लावलेला होता. यावेळी बंद स्थितीतील हा ट्रॅक्टर युवराज राठोड याने सदर ठिकाणी येऊन अनिल यांच्याशी उसन्या पैशाच्या कारणातून वाद घातला. थोड्या वेळाने युवराज यानेच येथे उभा असलेला ट्रॅक्टर तिथून चालू करुन पळवून नेला. याबाबत अनिल बाजीराव पवार (वय ३५, सध्या रा. घोलपवाडी, ता. शिरूर, मूळ रा. नाईकतांडा, ता. गेवराई, जि. बीड) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने पोलिसांनी युवराज माणिक राठोड (रा. खांडवी, ता. गेवराई, जि. बीड) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करुन ट्रॅक्टरचा माग काढत तपास सुरू केला. तपासात आरोपी हा ट्रॅक्टरसह दौंड तालुक्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस हवालदार अजित इंगवले व विकास कारखिले यांनी दौंडमध्ये जाऊन युवराज राठोड याला चोरीच्या ट्रॅक्टरसह ताब्यात घेत अटक केली. पुढील तपास पोलिस हवालदार अजित इंगवले हे करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

