केंदूरमध्ये जमिनीच्या वादातून ज्येष्ठ दांपत्यास मारहाण
शिक्रापूर, ता. ४ ः केंदूर (ता. शिरूर) येथील संजना ढेरे व भगवान ढेरे या ज्येष्ठ दांपत्यास शेताच्या वादातून मारहाण केली. याबाबत संजना ढेरे यांच्या फिर्यादीवरून त्यांच्याच भावकीतील तिघांवर शिक्रापूर पोलिसांनी गुन्हे दाखल केले.
शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केंदूर (ता. शिरूर) येथील संजना ढेरे व भगवान ढेरे हे आपल्या शेतात गवत कापत असताना त्यांच्या भावकीतील कलावती ढेरे, इंदुबाई ढेरे व अंकुश ढेरे हे तिघे तिथे आले. या तिघांनी संजना व भगवान यांना शिवीगाळ, दमदाटी करत ‘तुम्ही रानात का आला..’ असे म्हणून दगडाने मारहाण केली. ही घटना घडत असतानाच संजना यांचा मुलगा गणेश घटनास्थळी आला व त्याने मारहाण करणाऱ्या तिघांनाही ‘तुम्ही मारहाण का करता’ असे म्हणून अडविण्याचाही प्रयत्न केला. मात्र मारहाण करणाऱ्या वरील तिघांनी गणेशला देखिल शिवीगाळ, दमदाटी व ढकलाढकली केली. घडलेल्या प्रकाराबाबत संजना भगवान ढेरे (वय ६८, रा. केंदूर, ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून शिक्रापूर पोलिसांनी कलावती दादाभाऊ ढेरे, इंदूबाई अंकुश ढेरे व अंकुश दिनकर ढेरे (सर्व रा. केंदूर, ता. शिरूर, जि. पुणे) यांच्याविरुद्ध मारहाण, शिवीगाळीचा गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस हवालदार संतोष शेळके करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

