केंदूरच्या मारहाणप्रकरणी परस्परांविरोधात तक्रारी
शिक्रापूर, ता. ५ : केंदूर (ता. शिरूर) येथील शेताच्या वादातून झालेल्या माराहणप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी माहिती दिली की, संजना डेरे व भगवान डेरे या ज्येष्ठ नागरिक दांपत्याला त्यांच्याच भावकीतील कलावती डेरे, इंदूबाई डेरे व अंकुश डेरे यांनी मारहाण केली. याबद्दल या तिघांवर शिवीगाळ, दमदाटीचा गुन्हा दाखल आहे. याच प्रकरणात आता कलावती डेरे यांच्या शेतात खड्डे खोदल्याची विचारणा केली म्हणून भगवान भालचंद्र डेरे व त्यांचा मुलगा गणेश भगवान डेरे यांनी कलावती दादासाहेब डेरे या ज्येष्ठ महिलेस शिवीगाळ व दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी भगवान व गणेश यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस हवालदार संतोष शेळके करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

