जातेगावातील विद्यार्थ्यांकडून खैरेवाडी चकाचक
शिक्रापूर, ता. ११ ः ‘स्वच्छ खैरेवाडी- सुंदर खैरेवाडी’ हे ब्रीद घेऊन खैरेवाडी (ता. शिरूर) येथे हिवाळी श्रमसंस्कार शिबिरासाठी उतरलेल्या जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथील जिजामाता वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहा दिवसांत संपूर्ण गावाचा कायापालट केला.
जातेगाव बुद्रुक येथील गुरुदत्त ग्रामविकास प्रतिष्ठानच्या जिजामाता वरिष्ठ महाविद्यालयाचे वतीने खैरेवाडी येथे सहा दिवसांचे निवासी हिवाळी शिबिर नुकतेच पार पडले. स्वच्छ खैरेवाडी- सुंदर खैरेवाडी हे ब्रीद घेऊन सर्व विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवसांपासून दररोज संपूर्ण ग्रामस्वच्छता कार्यक्रम यशस्वी केला. यात स्मशानभूमी स्वच्छता, मंदिर परिसर स्वच्छता, रस्ते स्वच्छता, वृक्षारोपण, जलसंधारण कामे, बंधारा रस्ता आणि गावातील सामाजिक सर्वे आदी ठरवून दिलेली कामे पूर्ण करण्यात आली. दरम्यान, दररोजच्या व्याख्यान कार्यक्रमात पाबळ येथील प्राचार्य डॉ. संजय घोडेकर यांनी ऐतिहासिक स्थळांचे जतन ही सामूहिक जबाबदारी, प्राचार्या डॉ. अर्चना देसाई यांनी शाश्वत विकासात महिलांची भूमिका, प्रा. अनिल कापरे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेतील युवकांची भूमिका, प्रा. जयराम पवार यांनी शाश्वत शेतीसाठी जलसंवर्धन, प्रा. डॉ. विजय गायकवाड यांनी उद्योजकता विकास, प्रा. शाकुराव कोरडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन कार्य आदी विषयांवर सखोल माहितीपर मार्गदर्शन केले.
शिबिरादरम्यान, माजी सभापती प्रकाशबापू पवार यांनी विशेष भेट दिली. शिबिर यशस्वी करण्यासाठी सरपंच सीमा संदीप खरे, उपसरपंच निखिल गोडसे, ग्रामविकास अधिकारी आशा बळे- साकोरे, गावातील आजी- माजी पदाधिकारी, कार्यक्रम अधिकारी डॉ. विजय गायकवाड, प्रा. प्रथमेश कुलाळ, प्रा. सीमा बांगर, प्रा. केशव उबाळे, प्रा. आरिफ सय्यद व ग्रामस्थांनी विशेष योगदान दिले. सूत्रसंचालन दिव्या राठोड यांनी, तर समीक्षा उमाप यांनी आभार केले.
05225
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

