शिक्रापुरात मोटारीची रिक्षाला धडक ; चौघे गंभीर
शिक्रापूर, ता. ११ : पुणे-अहिल्यानगर महामार्गावर शिक्रापूर (ता. शिरूर) येथे मोटारीची धडक बसून रिक्षा रस्त्यावर उलटली. या दुर्घटनेत रिक्षातील चौघे प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी (ता . १०) घडली. याबाबत शिक्रापूर पोलिस ठाण्यात अज्ञात मोटारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीप भालके (वय ३२), रोहिणी संदीप भालके (वय २६), शिवकन्या संदीप भालके (वय ७, तिघेही रा.देहूफाटा इंदोरी, ता.मावळ) व प्रेमचंद लालबहाद्दूर पटेल (रा.अमौल जेंगर, ता.पिनंद्रा, जि.वाराणसी, उत्तर प्रदेश) असे गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत .
पुणे-अहिल्यानगर महामार्गावरून एका प्रवासी रिक्षा (एमएच १४ केयू ११२९)मधून संदीप भालके हे त्यांचे कुटुंबीय व मित्र प्रेमचंद पटेल यांच्यासह अहिल्यानगर बाजूने पुण्याच्या दिशेने प्रवास करत होते. यावेळी शिक्रापूर हद्दीत मलठण फाटा येथे पाठीमागून आलेल्या मोटारी (एमएच १२ एसएल ६१६१)ने रिक्षाला मागून धडक दिली. यामुळे रिक्षा महामार्गावर उलटली. यावेळी रिक्षा रस्त्यावर उलटल्याचे पाहून चालक मोटार रस्त्यावरच सोडून पळून गेला. या वेळी नागरिकांनी रिक्षा पुन्हा सरळ करून रस्त्याच्या कडेला घेतली. मात्र, रिक्षात बसलेले याबाबत रोहिणी संदीप भालके (वय २६, रा.देहूफाटा इंदोरी, ता.मावळ, मूळ रा. तपोवन रोड, बुरानगर, जि.अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार उद्धव भालेराव हे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

