
निघोजे येथे महिलांच्या व्यायामशाळेचे लोकार्पण
कुरुळी, ता.२१ : निघोजे (ता.खेड) येथे ग्रामपंचायतीने महिलांसाठीच्या सर्व सुविधांयुक्त स्वतंत्र व्यायामशाळेचे लोकार्पण करण्यात आले. चाकण औद्योगिक वसाहती लगत असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या अभिनव उपक्रमासाठी स्वतंत्र व्यायामशाळा प्रशिक्षक आणि व्यायामासाठी लागणारे साहित्य व जागा उपलब्ध केली आहे, अशी माहिती माजी उपसरपंच रूपाली येळवंडे यांनी दिली.
ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्य उत्तम राहावे, दररोज घरकामाव्यतिरिक्त व्यायामाची सवय व्हावी, यासाठी परिसरातील महिलांसाठी व्यायाम शाळा सुरू केली आहे. या व्यायामशाळेत मल्टी जिम चार स्टेशन, ऑलिम्पिक बेंच डंबल, सुपर बेंच एक्स्ट / कर्ल कॉम्बो ट्रेडमिल स्पिन सायकल, मिरर एसटीडी आकार, रबर मॅट चार आदी साहित्याची उपलब्ध करण्यात आली आहेत.
लोकापर्णप्रसंगी लोकनियुक्त सरपंच रमेश गायकवाड, उपसरपंच सुनीता शिंदे, सरपंच परिषदेचे अध्यक्ष आशिष येळवंडे, माजी उपसरपंच रामदास येळवंडे, जितेंद्र आल्हाट, नीलेश पवार, संदीप येळवंडे, चंद्रकांत बेंडाले, नम्रता येळवंडे, रिठाबाई सोनवणे, अलका पाडेकर, वृषाली पानसरे, सुजाता फडके, ग्रामविकास अधिकारी विष्णू गाडीलकर, आजी माजी पदाधिकारी, ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पुणे जिल्ह्यातील प्रथम निघोजे ग्रामपंचायतीने महिलांसाठी स्वतंत्र व्यायामशाळा सुरू केली आहे. सर्व ग्रामपंचायतींना शासनाकडून व्यायाम शाळेसाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी पत्र व्यवहार करून पाठपुरावा करणार आहे.
- आशिष येळवंडे, अध्यक्ष, सरपंच परिषद
01503