Tue, May 30, 2023

मोटारीच्या धडकेत
दुचाकीस्वार ठार
मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
Published on : 20 March 2023, 4:16 am
कुरुळी, ता. २० : भरधाव मोटारीची धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला; तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात शनिवारी (ता. १९) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास चाकण-तळेगाव रस्त्यावर महाळुंगे (ता. खेड) येथे झाला. ऋतिक आनंत मुसळे (वय २१), असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. आशिष सुरेंद्र सिंह (वय २३, रा. महाळुंगे; मूळ रा. मध्य प्रदेश), असे जखमी तरुणाचे नाव आहे. आशिष यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एम.एच. ४६ ए. एक्स. ११४९ या क्रमांकाच्या मोटार चालकावर गुन्हा दाखल केला.