पुणे
युवासेना जिल्हा समन्वयकपदी दीपक कांबळे
कुरुळी, ता. ९ ः शिरूर लोकसभेच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा समन्वयकपदी निघोजे (ता. खेड) गावचे उपसरपंच दीपक कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. तर, श्रीकांत सोनवणे यांची खेड तालुका युवा अधिकारी म्हणून निवड झाली. शिरूर लोकसभेतील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी पत्राद्वारे याबद्दल माहिती दिली. खेड तालुक्याच्या दक्षिण भागात अनेक वर्ष शिवसेनेमध्ये काम करणाऱ्या या शिवसैनिकांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ही संधी दिल्याचे सांगण्यात आले.