पुणे
चिंबळी येथे रक्तदान शिबिर
कुरुळी, ता. १७ ः चिंबळी (ता. खेड) येथे विश्व हिंदू परिषद बजरंग दल चिंबळी शाखेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. श्रीरामजन्मभूमी मुक्ती आंदोलनात भविष्यात श्रीरामाचे भव्य असे मंदिर व्हावे, ही इच्छा ठेऊन स्वतःच्या प्राणाची आहुती देणाऱ्या कारसेवकांच्या, हुतात्मे कोठारी बंधुंच्या स्मरणार्थ दरवर्षी बजरंग दलाच्या वतीने देशभर रक्तदान शिबिर राबविले जाते. रक्तदान शिबिराला खेड तालुक्याच्या दक्षिण भागातून विविध गावचे ग्रामस्थ यांनी भेट देऊन रक्तदान केले. यावेळी बजरंग दलाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व समस्थ ग्रामस्थ चिंबळी उपस्थित होते.

