पुणे
चाकण एमआयडीसीत ‘द बर्निंग कार’
कुरुळी, ता.१७ : जागतिक दर्जाच्या वाहन उद्योगाची पंढरी म्हणून मानल्या जाणाऱ्या चाकण एमआयडीसीच्या प्रमुख रस्त्यावर एका मोटारीने पेट घेतला; मात्र चालकाने प्रसंगावधान दाखविल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र जळून खाक झाली. त्यामुळे नागरिकांनी काही काळ ‘बर्निंग कार’चा थरार पाहिला मिळाला.
कुरुळी (ता. खेड) येथे रविवारी (ता. १६) स्पायसर चौक ते दाना कंपनीच्या दरम्यान मोटारचालक सागर त्यांच्या पत्नी असे दोघे महाळुंगे एमआयडीसी रस्त्याने जात असताना त्यांची मोटारी (एमएच १४ ३२०८)ने अचानकपणे पेट घेतला. तर वाहन चालकाच्या प्रसंगावधान दाखवल्याने मोटारीतील कोणालाही इजा झाली नाही. दरम्यान, चाकण नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले; मात्र तोपर्यंत मोटार जळून खाक झाली होती.
02298

