अपघातग्रस्त शेतकऱ्यांना वारसदारांना पावणेदोन कोटी अनुदान

अपघातग्रस्त शेतकऱ्यांना वारसदारांना पावणेदोन कोटी अनुदान

काटेवाडी, ता. ६ : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत २०२३-२४ या वर्षामध्ये बारामती कृषी उपविभागातील बारामती, इंदापूर, दौंड व पुरंदर या तालुक्यांतील ८६ अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसदारांना एक कोटी ७२ लाख रुपये इतक्या अनुदानाचा लाभ दिला आहे.

शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे आदी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, अन्य कोणत्याही कारणांमुळे होणाऱ्या अपघातामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू होतो, किंवा काहींना दिव्यांगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास किंवा दिव्यांगत्व आल्यास कुटुंबाला उदरनिर्वाह करण्यास अडचण निर्माण होते. अशा शेतकऱ्यास किंवा त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ देण्यात येतो.

आवश्‍यक कागदपत्रे
* योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जासोबत ७/१२ उतारा,
* मृत्यूचा दाखला,
* शेतकऱ्याचे वारस म्हणून गाव कामगार तलाठ्याकडील गाव नमुना क्र. ६ क नुसार वारसाची नोंद,
* शेतकऱ्याच्या वयाच्या पडताळणीकरीता शाळा सोडल्याचा दाखला,
* आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, वयाची खात्री होईल, असे कोणतेही कागदपत्र,
* प्रथम पाहणी अहवाल, स्थळ पंचनामा, पोलिस पाटील माहिती अहवाल

असे मिळते अर्थसाहाय्य
या योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी होणे, एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी होणे, या कारणास्तव दोन लाख रुपये, अपघातामुळे एक डोळा किंवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास एक लाख रुपये अर्थसाहाय्य करण्यात येते.

प्रस्ताव ३० दिवसांत सादर करावे
अपघातग्रस्त शेतकरी किंवा शेतकऱ्यांच्या वारसदारांनी सर्व कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्याकडे ३० दिवसांच्या आत सादर करावा, असे आवाहन उपविभागीय कृषी कार्यालयाच्यावतीने करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com