काटेवाडीत आले की आशा काकींना नमस्कार करते : सुळे

काटेवाडीत आले की आशा काकींना नमस्कार करते : सुळे

Published on

काटेवाडी, ता. ७ : ‘‘काटेवाडी येथील घर हे शारदाबाई पवार व गोविंदराव पवार यांचे आहे. येथे आशा काकी राहतात. मी जन्मापासून या घरामध्ये राहते. जेव्हा काटेवाडीमध्ये येते तेव्हा आशा काकींना नमस्कार करण्यासाठी येते. आशा काकी (अजित पवार यांच्या आई) यांच्यासह सुनेत्रा वहिनी यांच्या आई देखील येथे होत्या. त्यांना देखील मी व युगेंद्र पवार यांनी नमस्कार केला’’, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
काटेवाडी येथे रविवारी (ता. ७) संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे अभूतपूर्व उत्साहात स्वागत झाले. यावेळी या वारीसोहळ्यात खासदार सुप्रिया सुळे, शर्मिला पवार, युगेंद्र पवार सहभागी झाले होते. तसेच दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील वारी सोहळ्यामध्ये चालताना दिसून आले. मात्र खासदार सुप्रिया सुळे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे समोरासमोर आले नाहीत. यावर माध्यमांनी खासदार सुप्रिया सुळे यांना छेडले असता त्या म्हणाल्या, आम्ही भेटलो नाही. त्यामुळे बोलता आले नाही. काटेवाडीच्या घरामध्ये दिंडी व वारकऱ्यांना जेवण असते. मी घरामध्ये गेले. तेथे आशा काकी व सुनेत्रा वहिनी यांच्या आई यांना मी नमस्कार केला. जेवण दुसऱ्या बाजूला होते. वारकऱ्यांना वाढण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार व्यग्र होते. त्यामुळे त्यांची भेट झाली नाही, असे सुळे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.