पिकांच्या संरक्षणासाठी नवीन दराने भरा हप्ता
काटेवाडी, ता. ५ : शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम २०२५ साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत विमा हप्ते भरण्यास एक जुलै २०२५ पासून सुरुवात झाली आहे. पिकांना संरक्षण मिळवण्यासाठी नवीन दराने हप्ते भरावा, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना फार्मर आयडी आवश्यक आहे. तो नसल्यास तातडीने स्थानिक कृषी विभागाशी संपर्क साधून आयडी प्राप्त करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
यंदा राज्य शासनाने एक रुपयात पीक विमा योजना बंद करून नवीन हप्ता रचना लागू केली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर आणि गुंठ्यांनुसार निश्चित रक्कम भरावी लागेल. हा बदल शेतकऱ्यांना अधिक पारदर्शक आणि स्पष्ट विमा प्रक्रिया प्रदान करण्याच्या उद्देशाने आहे. याशिवाय, विमा कंपन्यांना २० टक्के पेक्षा जास्त नफा ठेवण्यास मनाई आहे आणि उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी वापरली जाईल किंवा राज्य शासनाला परत केली जाईल. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात प्रत्यक्ष लागवड केलेल्या पिकांचाच विमा काढावा. अन्यथा अर्ज नामंजूर होऊ शकतो. नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज करणे आणि फार्मर आयडी तयार ठेवणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी स्थानिक कृषी विभाग, बँका किंवा www.pmfby.gov.in वर संपर्क साधावा. या योजनेत कर्जदार आणि बिगर-कर्जदार शेतकरी दोघेही सहभागी होऊ शकतात. विमा अर्ज www.pmfby.gov.in वर ऑनलाइन किंवा आपले सरकार सेवा केंद्र, बँका आणि सहकारी संस्थांमार्फत करता येईल. विमा भरण्याची अंतिम मुदत १५ जुलै २०२५ आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
नवीन विमा हप्ता तक्ता
खालील तक्त्यात खरीप २०२५ साठी अधिसूचित पिकांसाठी प्रतिहेक्टर आणि गुंठ्यांनुसार विमा हप्त्याची रक्कम नमूद केली आहे. हा तक्ता शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीच्या क्षेत्रफळानुसार योग्य हप्ता निवडण्यास मदत करेल.
नवीन विम्याचा हप्ता प्रतिगुंठ्याची रक्कम
पीक...........१...........८०...........७०...........६०...........५०............४०...........३०...........२०...........१०
सोयाबीन...........११६०......९२८......८१२......६९६......५८०......४६४......३४८......२३२......११६
तूर...........८२०...........६५६...........५७४...........४९२...........४१०...........३२८...........२४६...........१६४...........८२
कापूस...........१७१०...........१३६८...........११९७...........१०२६...........८५५...........६८४...........५१३...........३४२...........१७१
मूग...........५००...........४००...........३५०...........३००...........२५०...........२००...........१५०...........१००...........५०
उडीद...........५००....४००...३५०...........३००...........२५०...........२००...........१५०...........१००...........५०
बाजरी...........५२०...........४१६..............३६४...........३१२...........२६०...........२०८...........१५६...........१०४...........५२
ज्वारी...........५८०...........४६४...........४०६...........३४८...........२९०...........२३२...........१७४...........११६...........५८
(टीप: वरील तक्त्यातील रक्कम रुपये प्रतिहेक्टर आणि प्रति गुंठे (आर) मध्ये आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या क्षेत्रफळानुसार योग्य रक्कम निवडावी.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.