जिरायती पट्ट्यातील पिके पाण्याअभावी तहानली

जिरायती पट्ट्यातील पिके पाण्याअभावी तहानली

Published on

काटेवाडी, ता. २७ : बारामती उपविभागातील बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर तालुक्यांमध्ये मागील दीड महिन्यांपासून समाधानकारक पावसाचा अभाव आहे. जून आणि जुलै महिन्यांतील पावसाच्या आकडेवारीनुसार, विशेषतः: इंदापूर तालुक्यातील जिरायती पट्ट्यातील पिके पाण्याअभावी तहानलेली आहेत. मे महिन्यातील अतिवृष्टीनंतर पावसाने या भागांना पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.


जून महिन्यात बारामती तालुक्यात सरासरी ८७.१ मिलिमीटर पावसाच्या तुलनेत ८२.४ मिमी (९४.६ टक्के) पाऊस झाला. इंदापूरला १०२.१ मिमी सरासरीच्या तुलनेत केवळ ६०.५ मिमी (६९.३ टक्के) पाऊस पडला. दौंड आणि पुरंदर तालुक्यांनी अनुक्रमे १२१.२ टक्के आणि १२४.७ टक्के पाऊस अनुभवला, ज्यामुळे या तालुक्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र, जुलै महिन्यात परिस्थिती आणखी बिकट झाली. बारामतीत सरासरी ५०.५ मिमीच्या तुलनेत केवळ २०.८ मिमी (४६.७ टक्के) पाऊस झाला, तर इंदापूरला ६८.१ मिमीच्या सरासरीच्या तुलनेत फक्त २२.० मिमी (३४.७ टक्के ) पाऊस पडला. दौंडमध्ये ५४.१ मिमीच्या सरासरीच्या तुलनेत ४२.६ मिमी (८४.४ टक्के) आणि पुरंदरमध्ये १०६.८ मिमीच्या सरासरीच्या तुलनेत ३२.९ मिमी (३९.३ टक्के) पाऊस नोंदवला गेला.


दृष्टिक्षेपात
१. जोरदार पावसासाठी शेतकऱ्यांना आणखी काही काळ वाट पाहावी लागण्याची चिन्हे
२. जिरायती शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना पावसाअभावी मोठा फटका
३. मागील दीड महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने पिकांचे नुकसान होण्याची भीती
४. येत्या काही दिवसांत पुणे जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता
५. नीरा डावा कालवा, उजनी धरण आणि नीरा नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेली ऊस लागवड सुरू

दुष्काळी गावांमध्ये पावसाची कमतरता
आत्तापर्यंतच्या हंगामात बारामतीत २१७.५ मिमी, इंदापूरला २००.८ मिमी, दौंडला २२४.३ मिमी आणि पुरंदरला १२६.४ मिमी पाऊस झाला आहे. यापैकी इंदापूर आणि बारामती तालुक्यांमधील दुष्काळी गावांमध्ये पावसाची कमतरता प्रकर्षाने जाणवत आहे. पावसाच्या कमतरतेमुळे खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांत पाऊस पडल्यास काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो, अन्यथा दुष्काळी परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती आहे.


जून महिन्याची पावसाची सरासरी व परिस्थिती
तालुका...... सरासरी...... झालेला पाऊस.....टक्केवारी
बारामती.....८७.१..........८२.४...........९४.६
इंदापूर.......१०२.१........६०.५...........६९.३
दौंड........९४.५.........११४.५.........१२१.२
पुरंदर......११२.३.........१४०............१२४.७


जुलै महिन्याची पावसाची सरासरी व परिस्थिती
तालुका...... सरासरी...... झालेला पाऊस.....टक्केवारी
बारामती.....५०.५..........२०.८..........४६.७
इंदापूर.......६८.१...........२२.०.........३४.७
दौंड.........५४.१..........४२.६.........८४.४

पुरंदर........१०६.८.........३२.९.........३९.३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com