रोग नियंत्रणासाठी मित्र कीटकांचा प्रहार प्रभावी

रोग नियंत्रणासाठी मित्र कीटकांचा प्रहार प्रभावी

Published on

काटेवाडी, ता. १ : शेतीतील हानिकारक किडींमुळे पिकांचे मोठे नुकसान होते, पण क्रायसोपा, लेडीबर्ड बीटल, सिरफिड माशी आणि ट्रायकोग्रामा यांसारखे मित्र कीटक या किडींवर प्रभावी नियंत्रण ठेवतात. मावा, तुडतुडे, पांढरी माशी यांसारख्या किडींवर हे कीटक नैसर्गिकरित्या प्रहार करतात, ज्यामुळे रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी होतो आणि पर्यावरणाचे रक्षण होते. त्यामुळे रोग नियंत्रणासाठी मित्र कीटकांचा वापर करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

रस शोषणाऱ्या किडींमुळे पिकांचे ३० ते ५० टक्के नुकसान होते. मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे पानांचा रस शोषून पिकांची वाढ खुंटवतात आणि विषाणूजन्य रोग पसरवतात. कृषी तज्ज्ञांच्या मते, एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) पद्धतीने मित्र कीटकांचा वापर केल्यास रासायनिक कीटकनाशकांचा वापर ४० ते ५० टक्के कमी होऊ शकतो. पिवळे आणि निळे चिकट सापळे लावून, कमी विषारी कीटकनाशके वापरून मित्र कीटकांचे संरक्षण करता येते. मित्र कीटकांचा प्रसार वाढवून शेतीला पर्यावरणपूरक बनवता येईल.


मित्र कीटक या किडींवर
खालीलप्रमाणे नियंत्रण ठेवतात:
* क्रायसोपा (माव्यांचा सिंह): क्रायसोपा माव्यांचा मोठा शत्रू आहे. त्याची अळी दररोज ५० ते १०० मावा खाते, तर प्रौढ क्रायसोपा आयुष्यभरात ५,००० मावा नष्ट करतो. याशिवाय, तो तुडतुडे, पांढरी माशी आणि लहान अळ्यांवरही हल्ला करतो, ज्यामुळे कपाशी, सूर्यफूल, भाजीपाला पिकांचे संरक्षण होते.
* लेडीबर्ड बीटल: मावा, खवले कीड, पिठ्या ढेकूण आणि कोळी यांच्यावर हा कीटक प्रभावी आहे. एक अळी दररोज ५० ते १०० मावा खाते, तर प्रौढ ३०० ते ४०० किडी नष्ट करते. फळबागा आणि धान्य पिकांसाठी हा कीटक उपयुक्त आहे.
* सिरफिड माशी: या माशीच्या अळ्या माव्यांवर उपजीविका करतात, तर प्रौढ माश्या परागीभवनास मदत करतात. एक अळी दररोज २० ते ३० मावा खाते, ज्यामुळे फुलझाडे आणि भाजीपाला पिकांचे रक्षण होते.
* ट्रायकोग्रामा: हा परोपजीवी कीटक फुलकिडे, पतंग, अळ्यांच्या अंड्यांवर उपजीविका करतो. एक मादी ट्रायकोग्रामा ५० ते १०० अंडी नष्ट करते, ज्यामुळे भात, मका, ऊस यांसारख्या पिकांचे नुकसान टळते.

36303

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com