कीटकनाशकांचा आलटून-पालटून करा : आढे
काटेवाडी, ता. ४ : वेगवेगळ्या रासायनिक गटांतील कीटकनाशके क्रमाक्रमाने वापरल्यास किडींना एकाच प्रकारच्या रसायनाची सवय होत नाही. सौम्य कीटकनाशकांपासून सुरुवात करून, गरजेनुसार तीव्रता वाढवावी. कीटकनाशके वेगवेगळ्या रासायनिक गटांमध्ये विभागली जातात आणि प्रत्येक गटाची किडींवर नियंत्रण मिळवण्याची पद्धत वेगळी असते. यामुळे कीटकनाशकांचा आलटून-पालटून करावा, असे आवाहन वॉटरशेड ओरगॅझेशन ट्रस्टचे कीटकशास्त्रज्ञ सचिन आढे यांनी सांगितले.
एकच कीटकनाशक वारंवार वापरल्याने किडींमध्ये प्रतिरोधकता निर्माण होऊन कीड नियंत्रण अयशस्वी होते. वेगवेगळ्या कार्यपद्धतीच्या कीटकनाशकांचा क्रमाक्रमाने वापर आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन शेतकऱ्यांचा खर्च कमी करून पिकांचे संरक्षण करते, असेही आढे यांनी सांगितले.
असे
किडींमध्ये प्रतिरोधकता का निर्माण होते
जेव्हा शेतकरी एकच कीटकनाशक वारंवार वापरतात, तेव्हा काही किडी फवारणीतून वाचतात. या वाचलेल्या किडींपासून पुढची पिढी जन्माला येते, जी त्या कीटकनाशकाविरुद्ध प्रतिरोधक असते. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) मते, देशातील १५ टक्के पेक्षा जास्त शेतकरी एकाच कीटकनाशकावर अवलंबून असतात. यामुळे कापूस, भात आणि भाजीपाला पिकांवर किडींची प्रतिरोधकता वाढली आहे, ज्याचा परिणाम उत्पादन घट आणि खर्चात वाढ यावर होतो.
कीटकनाशकांचे प्रकार आणि त्यांची कार्यपद्धती
* न्यूरोटॉक्सिन्स (मज्जासंस्थेवर हल्ला करणारी): कीटकनाशके किडींच्या मज्जासंस्थेवर हल्ला करतात, ज्यामुळे त्यांची हालचाल आणि श्वसनक्रिया थांबते. उदा., ऑर्गनोफॉस्फेट्स आणि कार्बामेट्स. यामुळे किडी तात्काळ मरतात.
चयापचय प्रक्रियेवर हल्ला करणारी : ही कीटकनाशके किडींच्या शरीरातील ऊर्जा निर्मिती प्रक्रिया खंडित करतात. उदा., पायरेथ्रॉइड्स, जे किडींच्या पेशींमधील ऊर्जा निर्मिती थांबवतात.
वाढीवर परिणाम करणारी: काही कीटकनाशके किडींच्या अंडी, अळ्या किंवा प्रौढ अवस्थेतील वाढ रोखतात. उदा., कीटक वाढ नियामक (Insect Growth Regulators) किडींच्या कात टाकण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणतात.
शारीरिक रचनेवर हल्ला करणारी: ही कीटकनाशके किडींच्या बाह्य कवचाला (क्यूटिकल) नुकसान पोहोचवतात, ज्यामुळे किडी निर्जलनाने मरतात. उदा., डायटोमेशियस अर्थ.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.