विक्री केलेल्या कांदा अनुदानाचा प्रश्न मार्गी
काटेवाडी, ता. १२ : उताऱ्यांवरील त्रुटींमुळे अपात्र ठरलेल्या व २०२२-२३ मध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांच्या कांदा अनुदानाचा प्रश्न मार्गी लागला आहे. राज्य शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने मंगळवारी (ता. १२) याबाबतचा अध्यादेश जारी केला आहे. पुणे जिल्ह्यातील २७७ कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ७८ लाख २४ हजार ३३० रुपये अनुदान वितरणास मान्यता दिली आहे.
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या, थेट पणन परवानाधारक आणि नाफेड केंद्रांमार्फत एक फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३५० रुपये, जास्तीत जास्त २०० क्विंटल मर्यादेत अनुदान देण्याचा निर्णय २७ मार्च २०२३ रोजी घेण्यात आला होता. यामध्ये जिल्ह्यातील २७७ शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत विक्री केलेल्या कांद्यासाठी ७८ लाख २४ हजार ३३०.५० रुपये अनुदान मंजूर झाले आहे. यात थेट पणन परवानाधारक, खासगी बाजार किंवा नाफेड केंद्रांमार्फत विक्रीचा समावेश नाही.
अपात्र शेतकऱ्यांच्या प्रस्तावांची फेरछाननी
राज्यभरात एकूण १४ हजार ६६१ शेतकऱ्यांना २८ कोटी ३२ लाख रुपये अनुदान वितरणास मान्यता मिळाली आहे. ७/१२ उताऱ्यांवरील त्रुटींमुळे अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या प्रस्तावांची फेरछाननी करून हे अनुदान पात्र शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. पणन संचालक, पुणे यांना हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याचे आदेश देण्यात आले असून, याबाबतचा अहवाल एका महिन्यात शासनास सादर करावा लागेल.
राज्यभरातील पात्र शेतकरी......१४,६६१
अनुदान एकूण रक्कम......२८ कोटी ३२ लाख ३० हजार ५०७ रुपये ५० पैसे
जिल्हानिहाय कांदा अनुदान आणि
शेतकरी संख्या (सन २०२२-२३)
नाशिक
पात्र शेतकरी संख्या...........९,९८८
अनुदान रक्कम...........१८ कोटी ५८ लाख ७८ हजार ४९३ रुपये ५० पैसे
धाराशिव
पात्र शेतकरी संख्या...........२७२
अनुदान रक्कम...........१ कोटी २० लाख ९८ हजार ७०५ रुपये ५० पैसे
पुणे ग्रामीण
पात्र शेतकरी संख्या...........२७७
अनुदान रक्कम...........७८ लाख २४ हजार ३३० रुपये ५० पैसे
सांगली
पात्र शेतकरी संख्या...........२२
अनुदान रक्कम...........८ लाख ०७ हजार २७८ रुपये
सातारा
पात्र शेतकरी संख्या...........२,००२
अनुदान रक्कम...........३ कोटी ०३ लाख ८६ हजार ६०८ रुपये
धुळे
पात्र शेतकरी संख्या...........४३
अनुदान रक्कम...........५ लाख ७१ हजार ६०९ रुपये ५० पैसे
जळगाव
पात्र शेतकरी संख्या...........३८७
अनुदान रक्कम...........१ कोटी ०६ लाख ४७ हजार ९७६ रुपये ५०
पैसे
अहमदनगर
पात्र शेतकरी संख्या...........१,४०७
अनुदान रक्कम...........२ कोटी ८१ लाख १२ हजार ९७९ रुपये ५० पैसे
नागपूर
पात्र शेतकरी संख्या...........२
अनुदान रक्कम...........२६ हजार ८०० रुपये
रायगड
पात्र शेतकरी संख्या...........२६१
अनुदान रक्कम...........६८ लाख ७६ हजार ०२६ रुपये ५० पैसे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.