खुटबाव येथे रंगला पुणेकर यांचा कृतज्ञता सोहळा

खुटबाव येथे रंगला पुणेकर यांचा कृतज्ञता सोहळा

Published on

खुटबाव, ता. ९ : खुटबाव (ता. दौंड) येथे सेवानिवृत्त मुख्याध्यापक धनंजय शंकर पुणेकर यांच्यासाठी देलवडी ग्रामस्थांच्या वतीने कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना धनंजय पुणेकर म्हणाले, ‘‘मी एकूण ३७ वर्षे शिक्षक म्हणून काम केले. आदर्श राष्ट्र व आदर्श नागरिक जडणघडणीमध्ये शिक्षकाचे स्थान मोलाचे आहे. मी या कार्यप्रणालीचा एक भाग म्हणून काम केले याचा मला अभिमान वाटतो. उर्वरित आयुष्य समाजसेवा, अध्यात्म, पर्यटन व कुटुंबासाठी समर्पित करायचे आहे.’’ यावेळी पुणेकर यांच्यावतीने देलवडी येथील आईचे बन येथे १० झाडे लावण्यासाठी २५०० रुपये देणगी देण्यात आली. याप्रसंगी नामदेव ताकवणे, भाऊसाहेब ढमढेरे, नरेंद्र काटे, सुदाम भापकर, श्रीकांत रसाळ, रमेश शेलार, प्रदीप वाघोले, गोदावरी देशमुख, केंद्रप्रमुख संजय चव्हाण, संपत सटाले, श्याम बेंद्रे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे संचालक रमेश थोरात, आदित्य कुल, शिवाजी वाघोले, दत्तात्रेय कोंडे, स्वाती पुणेकर, हर्षदा पुणेकर, चैतन्य पुणेकर, प्रिया पुणेकर, अप्पा पुणेकर, संदीप उपासनी, श्याम खुंटे, संजय नगरकर, प्रशांत कुलकर्णी, माधव टकले, शेखर पुणेकर आदी मान्यवर उपस्थित होते. सोमनाथ बंड यांनी प्रास्ताविक तर, आनंद भोसले यांनी सूत्रसंचालन केले. महादेव शेलार यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.