मृत्यूनंतरही न तुटलेली मैत्री
खुटबाव, ता. २ : वरवंड (ता. दौंड) येथील संजय दिवेकर व संजय जाधव हे बाल मित्र. आयुष्यातील प्रत्येक वळणावर एकमेकांना साथ देत. सर्व काही चांगले चालले असताना दिवेकर यांचे निधन झाले. आपल्या दिवंगत वर्गमित्राच्या स्मरणार्थ संजय जाधव यांनी गावामध्ये व्यायामशाळा व स्वागत कमान उभारली. तसेच मित्रांच्या स्मृतीचा सुगंध दरवळावा म्हणून वृक्षारोपण व आषाढीवारीत वारकऱ्यांची सेवा हा सामाजिक उपक्रम राबवले.
आपले पहिलीपासूनचे मित्र दिवेकर यांच्या स्मरणार्थ वर्गमित्र जाधव यांनी आठ लाख रुपये खर्चून मित्राच्या मृत्युपश्चात मैत्रीचे अनोखे ऋणानुबंध जोपासले आहेत. शालेय जीवनात दिवेकर हे स्काऊट लीडर होते, तर जाधव हे राष्ट्रीय सेवा योजना लीडर होते. दोघांनाही व्यायामाची आवड होती. दोघेही अनेकदा एकत्र व्यायाम करायचे. आयुष्यातील अनेक सुखदुःखाचे क्षण दोघांनी एकत्र घालवले. सर्व काही चांगले चालू असताना दिवेकर यांचे २७ डिसेंबर २०२१ रोजी वयाच्या ४८ व्या वर्षी निधन झाले. मित्राच्या मृत्यूने जाधव यांना धक्का बसला. यातून सावरत जाधव यांनी मित्रासाठी वरवंडमध्ये वास्तु उभारण्याचे ठरवले. सर्वप्रथम जाधव यांनी दिवेकर यांच्या घराकडे जाणाऱ्या गोपीनाथनगर येथे तीन लाख रुपये खर्चून स्वागतकमान उभारली. तसेच दिवेकर यांना व्यायामाची आवड होती, त्यांच्या पश्चात गावातील तरुणाईने व्यायामाची आवड जोपासावी म्हणून चार लाख रुपये किमतीची व्यायामशाळा बांधली. याशिवाय आषाढीवारीत दिवेकर यांच्या स्मरणार्थ जाधव परिवाराच्या वतीने वारकऱ्यांना मोफत चहा, बिस्कीट व नाष्ट्याचे वाटप केले जाते. मित्राच्या स्मृतीचा सुगंध दरळावा म्हणून वरवंड परिसरात ५० झाडांचे वृक्षारोपण केले आहे. याशिवाय दिवेकर कुटुंबातील प्रत्येक सुखदुःखामध्ये जाधव सहभागी होतात.
आम्ही दोघांनीही प्रतिकूल परिस्थितीमध्ये आमचा प्रपंच उभा केला. संजयचा मृत्यू नक्कीच वेदनादायी आहे. त्याला व्यायामाची आवड होती म्हणून व्यायाम शाळा उभारली. आज गावातील युवक या व्यायाम शाळेत व्यायाम करतात. त्याच्यासाठी उभारलेल्या प्रत्येक वास्तुमधून त्याच्या स्मृती जपण्याचा मी छोटा प्रयत्न केला आहे.
- संजय जाधव, ग्रामस्थ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.