शोभिवंत पक्षी विक्रीचा स्टार्टअप तेजीत

शोभिवंत पक्षी विक्रीचा स्टार्टअप तेजीत

Published on

खुटबाव, ता. २८ : देलवडी (ता.दौंड) येथील या १७ वर्षीय युवकाने तेजस गणपत होनमने मोबाईलवरून सोशल मीडियावर जाहिरात करत ऑनलाइन शोभिवंत व प्रदर्शनीय पक्षी विक्रीचा स्टार्टअप व्यवसाय सुरू केला आहे. आजीने २०२३ मध्ये दिलेल्या भांडवलावर सुरू केलेल्या या व्यवसायाची वार्षिक उलाढाल आता १४ लाख रुपयांवर पोचली आहे. या व्यवसायातून तेजसला वर्षभरात चार लाख रुपये नफा मिळाला आहे.
त्याचे पक्षी महाराष्ट्राबाहेर गुजरात व महाराष्ट्रामध्ये पुणे, कोल्हापूर, मनमाड, सांगली, संभाजीनगर, जालना येथे विकले जातात. संबंधित पक्ष्यांची ऑनलाइन बुकिंग केल्यानंतर तेजस ट्रॅव्हल्स किंवा रेल्वेने पार्सल सुविधांद्वारे तेजस ग्राहकांना पक्षी घरपोहोच करतो.

तेजस नववीला असताना दिवाळीच्या सुट्टीसाठी एका नातेवाइकाच्या घरी गेला होता. संबंधित नातेवाइकांकडे शोभिवंत पक्षी दिसले. परगाववरून घरी आल्यानंतर तेजसने शोभिवंत पक्षी विक्रीचा व्यवसाय करण्याचा मानस आजी रुक्मिणी मेमाणे यांना बोलून दाखवला. आजीने तेजसला ४० हजार रुपये भांडवल दिले. वडील गणपत होनमने व शोभा होनमने यांनी वेळोवेळी पैशाची मदत व मार्गदर्शन केले. त्यानंतर तेजसने शोभिवंत पक्ष्यांची पिल्ले विकत घेतली. त्यांचा सांभाळ करत मिळालेल्या नफ्यातून भांडवल वाढवत ऑनलाइन पक्षी विकण्यास सुरुवात केली. आज तेजसच्या घरासमोर ५०० पक्ष्यांचा खुराडा आहे. त्यांच्यासाठी खाद्य म्हणून वाया गेलेला भाजीपाला, फ्लॉवर, कोबी, मका भरडा, शिजवलेला भात, गहू, तांदूळ यांचा वापर केला जातो. विशेष म्हणजे ग्रामीण भागामध्ये तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने तेजसने युट्युबवर पाहून पक्ष्यांच्या आजारांवर अभ्यास केला. आजारांची लक्षणे तपासली. एखादा पक्षी आजारी असल्यास तेजस स्वतः डॉक्टर बनवून त्यांना इंजेक्शन देतो व औषधोपचार करतो.
दरम्यान, तेजस सध्या घरापासून लांब असणाऱ्या छत्रपती संभाजीराजे विद्यालय जातेगाव- मुखई (ता. शिरूर) येथे दररोज ८० किलोमीटर शाळेसाठी प्रवास करून अभ्यास करतो व स्वतःचा व्यवसाय सांभाळत आहे. दहावीमध्ये तेजसला त्याला ७९ टक्के गुण मिळाले आहेत. भाजप महिला राज्य उपाध्यक्षा कांचन कुल यांनी या व्यवसायाला भेट देत त्याचे अभिनंदन केले.

हे आहेत शोभिवंत पक्षी
राजहंस, टर्की, बदक, व्हाइट पेकिंग,
फायटर कोंबडा, अमेरिकन सिल्की कोंबडीची पिल्ले,
जिनीपॉल, बॅरम, ऑस्टोलॉप


पदवीचे शिक्षण पूर्ण करायचे आहे. त्यानंतर पूर्ण व्यवसायात लक्ष देणार आहे. भविष्यात मोठ्या प्रमाणावर पक्षीपालन व पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्याचा मानस आहे. व्यवसायासाठी कुटुंबीयांचा मिळणार पाठिंबा अतुलनीय आहे. व्यवसायाला दोन वर्षे झाल्याबद्दल सामाजिक उपक्रम राबवणार आहे.
- तेजस होनमने

02827

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com