कासुर्डीतून सहा टन धान्य व शैक्षणिक वस्तू

कासुर्डीतून सहा टन धान्य व शैक्षणिक वस्तू

Published on

यवत/खुटबाव, ता. ७ : कासुर्डी (ता. दौंड) येथील ग्रामस्थांनी मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील येथील पूरग्रस्तांसाठी सहा टन धान्य व शैक्षणिक वस्तू जमा केल्या. जमा केलेल्या वस्तूं धाराशिव‌ व सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना वाटण्यात आल्या.
युवकांनी गावामध्ये एक हात मदतीचा याअंतर्गत वाडी- वस्तीवर फिरून साहित्य गोळा केले. मिळालेल्या धान्य व पैशामधून ३५० किराणा किट तयार केले. यामध्ये गहू, बाजरी, तांदूळ, साखर, चहा पावडर, विविध डाळी, बेसन, मीठ, तेल, फरसाण, बिस्कीट पुडे, शालेय साहित्य यांचा समावेश होता.
खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रणजित पाटील, शिवसैनिक प्रशांत गायकवाड यांच्याशी संपर्क करत धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील लाकी, दुधी, करळेवस्ती, शिंदेवस्ती, करंजा या गावांमध्ये, तसेच सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील दारफळ आणि परिसरातील वाडीवस्ती या ठिकाणी या किटचे वाटप केले.
श्री भैरवनाथ मंदिरातून बाजार समितीचे संचालक संतोष आखाडे, बाळासाहेब टेकवडे व इतरांच्या हस्ते पूरग्रस्तांसाठी साहित्य पाठविण्यात आले.
टेम्पो वाहतूक सौजन्य महेश आखाडे यांनी दिले. स्वयंसेवक म्हणून लक्ष्मण खेनट, वासुदेव आखाडे, उत्तम आखाडे, मारुती आरडे, संतोष आखाडे, मयूर सोळसकर, अविनाश आखाडे, पांडुरंग वीर, बाळासाहेब आखाडे, राहुल बेंद्रे, ऋषिकेश जाधव, सूरज आखाडे, किरण खेनट, रामदास आखाडे, प्रमोद वीर, जेजेराम रेवडकर, संतोष ठोंबरे या युवकांनी काम केले.

02982

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com