देलवडीतील दवाखाना ‘असून अडचण नसून खोळंबा’

देलवडीतील दवाखाना ‘असून अडचण नसून खोळंबा’

Published on

प्रकाश शेलार : सकाळ वृत्तसेवा
खुटबाव, ता.१८ : देलवडी (ता. दौंड) येथील ६७०० हजार जनावरांना आरोग्याची सुविधा देणाऱ्या पशुवैद्यकीय श्रेणी-१ दवाखाना गेली १५ वर्षांपासून गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीत भरत आहे. दवाखाना शाळेच्या इमारतीत भरत असल्याने वर्षभरात दवाखान्यामध्ये एकही जनावर तपासणीसाठी येत नाही. सध्याच्या इमारतीचा छताचा पत्रा जीर्ण झाल्याने इमारत पावसाळ्यामध्ये गळत आहे. हा दवाखाना म्हणजे परिसरातील शेतकऱ्यांसाठी असून अडचण नसून खोळंबा ठरत आहे.

कर्मचाऱ्यांना स्वच्छतागृहाची सोय नसल्यामुळे जिल्हा परिषद शाळेच्या स्वच्छतागृहाचा वापर करावा लागत आहे. पशुधनविकास अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुविधा देण्यासाठी शेतकऱ्यांच्या गोठ्यावर जावे लागते. या दवाखान्यातर्गंत देलवडी, पिंपळगाव व एकेरीवाडी या तीन गावांचा समावेश होतो. दवाखाना शाळेत भरत असल्याने अनेकदा पशुपालकांचा शालेय परिसरात वावर असतो. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांना दवाखान्याचा अडथळा ठरतो.

दवाखान्याच्या पाठीमागे जनावरे डांबण्यासाठी लावण्यात आलेला लोखंडी खोडा हा शोभेची वस्तू झाला आहे. कर्मचारी गणेश भालेराव यांना देलवडी व्यतिरिक्त खामगावचा अतिरिक्त कार्यभार असल्याने त्यांची उपस्थिती दोन्हीही कार्यक्षेत्रात असते.

शासकीय योजना राबविण्याची गरज
गोशाळा सहाय्यता योजना, मेंढी-शेळी विकास योजना, दुग्ध व्यवसाय स्वयंरोजगार योजना, पशुसंवर्धन प्रशिक्षण कार्यक्रम, राष्ट्रीय पशुधन मोहीम आदी योजना पशुपालकांसाठी राबविण्याासठी पशुसंवर्धन विभागाने पुढाकार घेण्याची नितांत गरज आहे, मागणी एका शेतकऱ्याने केली आहे.


पिंपळगाव-पारगाव रस्त्याशेजारील देलवडीच्या पूर्वेला असणाऱ्या बारव शेजारी या दवाखान्यासाठी ग्रामपंचायतीने चार गुंठे आरक्षित जागा केली आहे. जिल्हा परिषदेकडून या दवाखान्यासाठी सन २०२० मध्ये ५६ लाख रुपये मंजूर झाले होते. माजी जिल्हा परिषद सदस्या राणी शेळके यांच्या हस्ते इमारतीचे भूमिपूजन झाले. परंतु ऐनवेळी निधी इंदापूर तालुक्यातील दुसऱ्या पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी गेल्याने अद्याप येथील दवाखान्यासाठी स्वतंत्र इमारत प्रलंबित आहे.
- नीलम काटे, गोपालक/ माजी सरपंच

सर्वात मोठी अडचणी इमारतीची आहे. इमारत नसल्याने अत्याधुनिक साधनसामग्री मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सेवा सुविधा देण्यात अडचणी येत आहेत. उपलब्ध साधने व सोयीसुविधानुसार पशुपालकांना सुविधा देण्याचा प्रयत्न करते. नवीन धोरणानुसार या दवाखान्यात भविष्यात अजून एक कर्मचारी येणे गरजेचे आहे.
- डॉ. नीता लाडुकर, पशुधन विकास अधिकारी)

यांची आहे गरज
- सुसज्ज इमारत
- स्वतंत्र स्वच्छतागृह
- पाण्याची टाकी
- जनावरे तपासण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था
- अत्याधुनिक एक्स- रे मशिन
- कर्मचारी निवासी व्यवस्था


पशुधनाची संख्या (२० व्या पशुगणनेनुसार)
गायी -३०२६
मेंढी -१६८०
म्हशी-१५११
शेळी -४५३
कुक्कुटपालन-३२ हजार
इतर जनावरे-३२


दृष्टिक्षेपात वंधत्व निर्मूलन मोहीम

वार्षिक गर्भ तपासणी संख्या........८३२
बछड्यांचे जन्म संख्या..........१११
वंधत्व दर संख्या..........१६३
कृत्रिम रेतन केंद्रांची संख्या -७००


लसीकरण
लाळ्या-खुरकूत (FMD).........४६६०
PPR/ ET (मेंढी-शेळींसाठी).............३१६०/९३०


दृष्टिक्षेपात दवाखाना
- लंपीच्या आठ जनावरांची नोंद
- ऑनलाइन अर्ज, डेटा एंट्री, मोबाईल अ‍ॅप वापर होतो
- पशुपालकांसाठी प्रशिक्षण, जनजागृती व नवकल्पना


चारा व वैरण विकास
- चारा उत्पादन क्षेत्र (हेक्टरी) ...........२५० हेक्टर
- वैरण बियाण्यांचे वितरण झाले शेतकरी.........१००
- हरित व सुक्या चाऱ्याची वर्षभर मुबलक व्यवस्था

03085

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com