पुणे
भीमा सोसायटीच्या अध्यक्षपदी बोत्रे
खुटबाव, ता. ८ : पारगाव (ता. दौंड) येथील भीमा सोसायटीच्या अध्यक्षपदी मच्छिंद्र बोत्रे तर उपाध्यक्षपदी नितीन शिवरकर यांची बिनविरोध निवड झाली. बाळकृष्ण भोसले व उपाध्यक्ष दत्तात्रेय बोत्रे यांनी इतरांना संधी मिळावी म्हणून राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी निवडणूक घेण्यात आली. सी. एस. राजभोज यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. तर, सचिव जीवराज ताकवणे यांनी सहाय्यक म्हणून काम पाहिले. यावेळी संस्थापक अध्यक्ष सुभाष बोत्रे, राजाराम बोत्रे, आनंदराव ताकवणे, सूर्यकांत शेळके, विजय चितळकर, हरिदास बोत्रे, विठ्ठल शिशुपाल, सुरेखा बोत्रे, आशा रणदिवे, हनुमंत बोत्रे, राजहंस रुणवाल आदी उपस्थित होते.

