जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांना फोटोथेरपी युनिट

जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांना फोटोथेरपी युनिट

Published on

खुटबाव, ता. ९ : पुणे ग्रामीणमधील नवजात अर्भकांच्या कावीळपासून संरक्षणासाठी पुणे शहरातील १९ रोटरी क्लब सरसावले आहेत. या १९ स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून जिल्ह्यातील ३२ प्राथमिक आरोग्य केंद्रांना सव्वापाच लाख रुपये किमतीची फोटोथेरपी युनिट मोफत भेट देण्यात आली.
पुण्यातील एका कार्यक्रमात जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना या युनिटचे वितरण करण्यात आले. रोटरी क्लबचे प्रांतपाल संतोष मराठे, रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगरच्या अध्यक्षा अलका कांबळे, सचिव अभिषेक जाधव, रोटरी बाल संगोपन समितीच्या सदस्या डॉ. शोभा राव, डॉ. स्मिता जोग आदी यावेळी उपस्थित होते.
संयोजक डॉ. शोभा राव म्हणाल्या, ‘‘जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगार, वीट भट्टी कामगार, मजूर कुटुंबातील अनेक नवजात अर्भकांचा जन्म प्राथमिक आरोग्य केंद्रात होतो. सदर अर्भक मुदतपूर्व जन्मल्यास त्याला कावीळ होण्याची संभावना असते. त्यामध्ये अर्भक दगावू शकते. अशावेळी त्या अर्भकाला जन्मल्यानंतर अल्ट्रा व्हायलेट क्ष किरणांखाली ठेवल्यास ते अर्भक वाचवता येते. क्लबच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जाण्याचा योग आला. परंतु, त्या ठिकाणी फोटो थेरेपी युनिट नसल्याचे लक्षात आले. सदर गरज लक्षात घेऊन १९ रोटरी क्लबच्या सहभागातून फोटो थेरपी युनिट भेट देण्यात आले.’’

रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगरच्या पुढाकारातून दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यातील ३२ प्राथमिक आरोग्य केंद्रांना बेबी वॉर्मर मशीन मोफत भेट देण्यात आले होते. त्यानंतर हा दुसरा स्तुत्य उपक्रम राबवला आहे.
- संतोष मराठे, रोटरी, प्रांतपाल

भेट देण्यात आलेले आरोग्य केंद्र- दौंड ग्रामीण रुग्णालय, इंदापूर ग्रामीण रुग्णालय, यवत ग्रामीण रुग्णालय- २, लोणी काळभोर, खेड शिवापूर, मुठा, कुंजीरवाडी, श्लोक हॉस्पिटल, रावणगाव, माले, नेरे, खामगाव, राहू ,वरवंड, कुरकुंभ, खेडशिवापूर, देऊळगाव राजे, सोनवणे हॉस्पिटल पुणे, कमला नेहरू हॉस्पिटल पुणे, केडगाव, बेलसर, वाघोली, बावडा, तळेगाव ढमढेरे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com