दारू व मटका अड्ड्यांवर कुरकुंभ परिसरात कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दारू व मटका अड्ड्यांवर
कुरकुंभ परिसरात कारवाई
दारू व मटका अड्ड्यांवर कुरकुंभ परिसरात कारवाई

दारू व मटका अड्ड्यांवर कुरकुंभ परिसरात कारवाई

sakal_logo
By

कुरकुंभ, ता. ५ : दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील शेवाळे प्लॉट या नागरी वसाहत परिसरातील गावठी दारू व खडकी येथील कल्याण मटका अड्ड्यावर छापा टाकून दोन्ही अड्डा चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुरकुंभ येथील शेवाळे प्लॉट नागरी वसाहत परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून गावठी दारुची विक्री केली जात आहे. परिसरातील ग्रामस्थ व औद्योगिक वसाहतीतील कामगारांचे ही गावठी दारू पिऊन संसार उध्वस्त झाले आहेत. ही दारूविक्री कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी महिला व ग्रामस्थांकडून होत आहे. पोलिसांनी या दारूअड्ड्यावर छापा टाकून गावठी दारू जप्त केली. या प्रकरणी झरिना ओमशे राठोड (रा. शेवाळे प्लॉट, कुरकुंभ, ता. दौंड) या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस नाईक संजय नगरे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

खडकी येथील कल्याण मटका सुरू असलेल्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून मटक्याचे साहित्य जप्त केले. या प्रकरणी मटकाचालक विकास दत्तात्रेय शिंदे (वय ४७, रा. खडकी, ता. दौंड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात पोलिस हवालदार बापूराव बंडगर यांनी फिर्याद दिली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.