कुरकुंभला सरपंचपदासाठी पाच उमेदवार

कुरकुंभला सरपंचपदासाठी पाच उमेदवार

Published on

कुरकुंभ, ता. ३ : दौंड तालुक्यातील मोठी औद्योगिक वसाहत असलेल्या कुरकुंभ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत वर्चस्वासाठी गावकारभाऱ्यांनी कंबर कसली आहे. सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. सरपंचपदासाठी पंचरंगी लढत होत आहे. ग्रामविकास पॅनेल व बहुजन ग्रामविकास पॅनेल या दोन पॅनेलमध्ये लढत होत असून, काही अपक्ष निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
कुरकुंभ ग्रामपंचायतीच्या सदस्यांची संख्या तेरा असून, त्यापैकी दोन सदस्यांची निवड बिनविरोध झाली आहे. उर्वरित अकरा जागांसाठी बावीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ग्रामपंचायतीची एकूण मतदार संख्या ३२३६ असून, स्त्रियांची संख्या १५३५; तर पुरुषांची संख्या १७०१ आहे. सरपंचपदासाठी सुनील केशव खंडाळे, बाबा शिवदास गायकवाड, सोमनाथ अशोक गायकवाड, स्वप्नील दादासाहेब गायकवाड, मोहन रामभाऊ सोनवणे या पाच उमेदवारांमध्ये लढत होत आहे. सदस्यपदासाठीचे उमेदवार पुढीलप्रमाणे- प्रभाग क्रमांक १ : सीमा मिथुन गायकवाड, विद्या शरद दोडके, अंकिता उमेश सोनवणे (अनुसूचित जाती स्त्री राखीव). जयश्री संदीप भागवत, तेजश्री कुलदीप भागवत (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव).
प्रभाग क्रमांक २ : स्वप्नील निवृत्ती कांबळे,भानुदास रामभाऊ सोनवणे (अनुसूचित जाती सर्वसाधारण राखीव). हरिश्चंद्र पांडुरंग भागवत, रशीद सल्लाउद्दीन मुलाणी (सर्वसाधारण).
प्रभाग क्रमांक ३ : अभिजित तुकाराम शितोळे, संतोष पोपट सोनार (सर्वसाधारण). बायडाबाई विलास खोमणे, प्रियांका गणेश जाधव (सर्वसाधारण स्त्री). गणेश बापू कुंभार, रफीक गफूरभाई शेख (नागरिकांचा मागास प्रवर्ग).
प्रभाग क्रमांक ४ : सुनंदा अरुण भागवत, पूनम योगेश भागवत (सर्वसाधारण स्त्री) तर नागरिकांचा मागास प्रवर्ग स्री राखीव जागेवर अश्विनी बाळकृष्ण गिरमे यांचा, तर सर्वसाधारण जागेसाठी संजय किसन शितोळे यांचा प्रत्येकी एक अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.
प्रभाग क्रमांक ५ : सुनीता संजय जाधव, कविता विजय जाधव, वंदना सूर्यकांत भागवत (सर्वसाधारण स्त्री). संजय जयसिंग जाधव, सचिन श्रीरंग साळुंके (सर्वसाधारण).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.