शिवराय-शंभुराजे भेटीचा गुरुवारपासून पाखली सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवराय-शंभुराजे भेटीचा गुरुवारपासून पाखली सोहळा
शिवराय-शंभुराजे भेटीचा गुरुवारपासून पाखली सोहळा

शिवराय-शंभुराजे भेटीचा गुरुवारपासून पाखली सोहळा

sakal_logo
By

मंचर, ता.२ : “स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शिवनेरी गड (ता.जुन्नर) ते पुरंदर गड (ता.पुरंदर) या मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शंभुराजे भेट पालखी सोहळ्याचे आयोजन केले आहे. या सोहळ्याचे हे पाचवे वर्ष आहे. गुरुवारी (ता.५) शिवनेरी किल्ल्यावरून पालखीचा प्रारंभ होणार आहे,” अशी माहिती पालखी सोहळ्याचे प्रमुख बाजीराव महाराज बांगर यांनी दिली.
ते म्हणाले, की गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी गडावरून पालखीचा प्रारंभ होईल. सकाळी दहा वाजता जयहिंद कॉलेज ऑफ इंजिनिअर कुरण (ता.जुन्नर) ते नारायणगाव, कळंब, मंचर शहर तसेच पेठ येथे मिरवणूक होईल. चांडोली-राजगुरुनगर येथे भैरवनाथ/मारुती मंदिरात मुक्कामानंतर शुक्रवारी (ता.६) सकाळी सात वाजता प्रस्थान होईल.त्यानंतर चाकण, आळंदी, मरकळ, तुळापूर, नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक स्कूल, पुलगाव व श्रीक्षेत्र वडू येथे मुक्काम होईल. शनिवारी (ता.७) सकाळी सात वाजता प्रस्थानानंतर लोणीकंद, वाघोली, केसनंद, कोलवडी, थेऊर येथे मुक्काम होईल. रविवारी प्रस्थान झाल्यानंतर लोणी काळभोर/फुरसुंगी, वडकी नाला-दिवेघाट मार्गे सासवड, कोडीत देवस्थान म्हसोबा महाराज मंदिर येथे मुक्काम होईल. सोमवारी (ता.९) सकाळी प्रस्थान झाल्यानंतर सकाळी आठ वाजता क्षेत्र नारायणपूर, सकाळी साडेनऊ वाजता शंभूराजे यांचे जन्मस्थळ पुरंदर गड येथे आगमन, सकाळी दहा वाजता येथे भेटीचा सोहळा संपन्न होणार आहे. तरी पालखी सोहळ्यात भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन बाजीराव महाराज बांगर यांनी केले आहे.