भीमाशंकर पायरी मार्गाच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भीमाशंकर पायरी मार्गाच्या
रुंदीकरणाचा मार्ग मोकळा
भीमाशंकर पायरी मार्गाच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा

भीमाशंकर पायरी मार्गाच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा

sakal_logo
By

मंचर, ता. २ : श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्यातील पायरी मार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी खेड तालुक्यातील भोरगिरी व आंबेगाव तालुक्यातील निगडाळे येथील एकूण ०.२८७ हेक्टर वन जमीन वळतीकरण करण्यासाठी केंद्र शासनाने मान्यता दिली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे (उत्तर) कार्यकारी अभियंता रा. य. पाटील यांनी दिली.
राखीव वन क्षेत्राअंतर्गत भोरगिरी येथील गट क्रमांक १३० (सी. नं. २०१- क्षेत्र ०.०८४ हेक्टर) निगडाळे येथील गट क्रमांक २४४ (सी.नं. २०० ए- क्षेत्र ०.१६८, ०.०२० व ०.०१५ हेक्टर) अशी एकूण ०.२८७ हेक्टर वन जमीन वळतीकरण करण्यास मान्यता दिली आहे.
वन जमीन वळतीकरणास मान्यता देताना प्रकल्प यंत्रणा वन (संवर्धन) अधिनियम, १९८० अंतर्गत केंद्र शासनाने तत्वत: मान्यता दिलेल्या आदेशातील सर्व अटींचे पालन केल्याची उप वनसंरक्षक (वन्यजीव) पुणे यांनी खात्री करावी. अधिनियमातील अटींचे अनुपालन न करणाऱ्यांवर वैधानिक कारवाई करण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करण्यात येऊ नये. मजुरांचे वास्तव्यासाठी वनक्षेत्रात तात्पुरते निवारा केंद्र उभारण्यात येऊ नये, हे मान्यता आदेश १ वर्षापर्यंत वैध राहतील, अशा अटी व शर्तीचे अधीन राहून मान्यता दिली आहे.