Wed, Feb 8, 2023

श्रीराम विद्यालयातील पाच विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत
श्रीराम विद्यालयातील पाच विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत
Published on : 6 January 2023, 9:56 am
मंचर, ता.५ : ‘‘पिंपळगाव-खडकी (ता.आंबेगाव) येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्रीराम विद्यालयातील पाच विद्यार्थ्यांची राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत निवड झाली आले.’’ अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक जगन्नाथ टेके यांनी दिली.
टी.के. बांगर, मथाजी पोखरकर, अशोक बांगर, सुनीता बांगर, सरपंच दीपक पोखरकर व ग्रामपंचायत सदस्यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.
नीलेश बाणखेले, संजय दाभाडे, सखाराम दाभाडे, नीता आवटे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. शिष्यवृत्तीधारकांमध्ये विद्यार्थ्यांची नावे व कंसात मिळालेले गुण : ऋतुजा शशिकांत पोखरकर (२३२), ऋतुजा सुनील पोखरकर (२१८), सानिका शेखर दोंदेकर (२१६), शिवराजे मंगेश भोसले (२१४), सौरभ सुनील पोखरकर (१९२).