मंचरमधील व्यावसायिकाची सव्वापाच लाखांची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंचरमधील व्यावसायिकाची
सव्वापाच लाखांची फसवणूक
मंचरमधील व्यावसायिकाची सव्वापाच लाखांची फसवणूक

मंचरमधील व्यावसायिकाची सव्वापाच लाखांची फसवणूक

sakal_logo
By

मंचर, ता. २१ : येथील व्यावसायिक गौतम प्रमोद सोनवणे यांची पाच लाख २६ हजार ७७२ रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाली आहे. याप्रकरणी श्री राधे केमिकल्सचे विजय आगरवाल (रा. मुजाफरनगर उत्तरप्रदेश) याच्यावर मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनवणे यांची ट्रेड इंडिया (trade India) संकेतस्थळावरून २१ मे २०२१ रोजी आगरवाल यांच्यासमवेत ओळख झाली. ‘मी कॉस्टिक सोडा प्लेक्सचा सप्लाय करतो,’ असे आगरवाल याने सांगितले. सोनवणे यांनी विश्वास ठेऊन ३९ टन कॉस्टिक सोडा सप्लाय करण्याचा व्यवहार केला. त्यासाठी आगाऊ रक्कम म्हणून ११ लाख २४ हजार ६०० रुपयांची मागणी आगरवाल याने केली. सोनवणे यांनी त्याला आरटीजीएसद्वारे मे, जून २०२१ मध्ये एकूण ११ लाख २४ हजार ६०० रुपये रक्कम पाठवली. सुरवातीला पाच लाख ९८ हजार २६० रुपये या किमतीचा २१ टन कॉस्टिक सोडा प्लेक्सचा पुरवठा आगरवाल याने केला. उर्वरित मालासाठी सोनवणे यांनी त्याच्याशी संपर्क केला. त्यावर लवकरच उर्वरित १८ टन माल पाठवतो, असे सांगितले. मात्र, वारंवार संपर्क करून देखील उर्वरित माल पाठवला नाही. तसेच, रक्कमही परत दिली नाही. त्यांनतर आगरवाल याने सोनवणे यांच्या बँक खात्यावर पैसे पाठविले आहेत. असे खोटे ट्रान्सफर एसएमएस पाठविले होते. परंतु, प्रत्यक्षात पैसे पाठविलेच नाही.
याप्रकरणी पुढील तपास मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जवान सुदाम घोडे हे करत आहेत.