पाटील विद्यालयात मुलांनी रेखाटले भावविश्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाटील विद्यालयात मुलांनी रेखाटले भावविश्व
पाटील विद्यालयात मुलांनी रेखाटले भावविश्व

पाटील विद्यालयात मुलांनी रेखाटले भावविश्व

sakal_logo
By

मंचर, ता. २२ : लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथील श्री शिवाजी आढळराव पाटील विद्यालयात सकाळ एनआयईतर्फे आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘मी लस घेतली हे दाखवणारा मुलगा’, मिरवणुकीचा सजवलेला घोडा, क्रिकेटचा सामना पाण्याखालची जीवसृष्टी, वाढदिवसाचा केक यासारख्या विषयांवर विद्यार्थ्यांनी आपले भाव विश्व रंगविले. दोन वर्षाच्या कालखंडानंतर यावर्षी विद्यार्थ्यांसह शिक्षक पालकांचा विशेष सहभाग होता.
लांडेवाडी येथील श्री शिवाजी आढळराव पाटील विद्यालय केंद्रावर एकूण १७२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेचे नियोजन सकाळ एनआयई सहव्यवस्थापक विशाल सराफ, केंद्रप्रमुख राजू आढळराव, दादाभाऊ लांडे, मारुती कोरडे, नितीन वाघमारे, बाळासाहेब वाघमारे त्याचप्रमाणे वृत्तपत्र विक्रेते मधुकर ढेरंगे यांनी स्पर्धेची व्यवस्था पाहिली.
दोन वर्षाच्या कालखंडानंतर आम्ही या चित्रकला स्पर्धेत सहभाग घेतला आहे. ऑनलाइन शाळेनंतर पहिल्यांदा एकत्रित चित्र काढण्याची संधी मिळाली, असे विद्यार्थी समर्थ रणदिवे, आयुष निघोट, सोहम पिंगळे म्हणाले.