गांधी विद्यालयात स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गांधी विद्यालयात स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
गांधी विद्यालयात स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

गांधी विद्यालयात स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

sakal_logo
By

मंचर, ता.२२ : रयत शिक्षण संस्थेचे महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मंचर (ता.आंबेगाव) येथे बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण २२४ विद्यार्थी सहभागी झाले होते.
इंग्लिश मीडियम स्कूल नालंदा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोंढे मळा, महात्मा गांधी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथील हौशी बालचित्रकारांनी सहभाग नोंदवून चित्र रेखांकित करण्याचा आनंद लुटला.''अ'' गटात ५१ ''ब'' गटात ७३ ''क'' गटात ७१ ''ड'' गटात २९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. फिश टॅंक, बर्थडे केक, कार्टून आदी चित्र रेखाटण्यात बालचित्रकारांचा कल अधिक होता. विद्यालयाचे पर्यवेक्षक यादव चासकर,कलाशिक्षक दिलीप चौधरी, सुनित्रा दत्तात्रेय थोरात, नंदा केंगले, संतोष मुंढे, विशाल गाडे, प्रलय गावंड,सोनाली सोनावणे,विजय शेळकंदे यांनी चित्रकला स्पर्धेचे नियोजन पहिले.
...................
07337